आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं’, 'सर्जेराव' संग्राम साळवीचा Dialogue झाला Popular

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कलर्स मराठी’वर २८ डिसेंबरपासून सरस्वती ही मालिका सुरू झाली. गेल्या अडीच आठवड्यात ह्या मालिकेतली एक-एक करून जवळजवळ सगळीच मुख्य पात्र आता प्रेक्षकांच्या परिचयाची झालीयत. सरस्वतीची कथा आता इथून पुढे हळूहळू खुलताना दिसेलच. पण मालिकेच्या नायिकेने आपल्या सोज्वळ रूपाने लोकांच्या मनात घर करण्याअगोदर मालिकेतल्या सर्जेरावाने लोकांना भुरळ घातलीय.
सर्जेराव चौधरीच्या भुमिकेत अभिनेता संग्राम साळवी आहे. संग्रामचा ‘तुम्ही बोलायचं आम्ही ऐकायचं’ हा पेटंट डायलॉग आता प्रेक्षकांच्या ओठांवर रूळलाय. आपल्या ह्या डायलॉगबद्दल सांगताना संग्राम म्हणतो, “जेव्हा ही मालिका मिळाली, तेव्हा हा रावडी सर्जेराव चौधरी, त्याची रांगडी स्टाइल, त्याचा गावरान बाज हे सगळं उभं करताना आम्ही खूप विचार केला. कारण मी ह्या अगोदर ‘स्टार प्रवाह’वर केलेल्या देवयानी मालिकेतल्या माझ्या भुमिकेचीही प्रेक्षकांवर छाप होतीच. त्यातही मी कोल्हापूरच्या एका रांगडी भुमिकेत होतो. पण रांगडीपणामध्येही वेगवेगळे अंदाज असतात. त्यामुळेच मग सर्जेराव चौधरी शोधताना त्याचं व्यक्तिमत्व लक्षात राहावं म्हणून हा डायलॉग ठेवला.”
जवळ जवळ दिड वर्षापूर्वी संग्रामची देवयानी मालिका संपली. त्यानंतर संग्रामने नागेश भोसलेंच्या ‘पन्हाळा’ चित्रपटात काम केले. पण आता पून्हा मालिका सुरू झालीय म्हटल्यावर आता चित्रपटाला तात्पुरता स्वल्पविराम का? असं विचारल्यावर संग्राम म्हणतो, “नाही, अजिबात नाही. मी नुकतंच नागेश भोसलेंच्याच ‘शिवार’ नावाच्या फिल्मचे शुटिंग पूर्ण केलेय. ती यंदा रिलीज होईल. ह्याशिवाय इतर सिनेमेही अधूनमधून करत राहिन. मालिकेत मी मुख्य भुमिकेत नसल्याने चित्रपटासाठी अधूनमधून वेळ काढणे शक्य आहे.”
‘देवयानी’त दिसलेला ‘बॉडीबिल्डर’ संग्राम आता बराच बारीक झालाय. हे बारीक होणं ‘सरस्वती’ मधल्या सर्जेराव चौधरीच्या भुमिकेसाठी? की त्याच्या चित्रपटांमधल्या एखाद्या भुमिकेसाठी? असं विचारल्यावर संग्राम म्हणतो, “स्वत:साठी. देवयानी करताना शुटिंगच्या गडबडीत मी खाण्यापिण्याकडे खूपच दुर्लक्ष केलं. पण मालिका संपल्यावर आपण किती जाड होतं गेलो. ते लक्षात आलं. मग गेल्या दिड वर्षात जीम आणि डाएट करून मी १६ किलो वजन कमी केलंय.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, सर्जेरावचा पेटंट डायलॉग
बातम्या आणखी आहेत...