आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dance Rehearsals Of Amruta Khanvilkar And Mukta Barve For MFK Awards

अमृता होणार Sensuousतर मुक्ताचा Romantic डान्स, पाहा, MFK अवॉर्ड्ससाठी मुक्ता-अमृताची जय्यत तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या अमृता खानविलकर आणि मुक्ता बर्वे दोन्ही अभिनेत्री खूप खुशीत आहेत. कारणही तसंच आहे, दोघींचेही चित्रपट नुकतेच बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेत. आणि दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळालीय. दिवाळीत सलमान खानच्यासोबत रिलीज झालेले दोन्ही मराठी चित्रपट चांगले चालण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोघींनाही खरं, तर हे कारण नाचायला पुरेस आहे. पण ‘झी’ने दोघींनाही सर्वांसमोर थिरकायचं अजून एक कारण दिलंय.
‘झी टॉकिज’चा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा पुरस्कार सोहळा होतोय. आणि ह्या पुरस्कारात मुक्ता आमि अमृता दोघीहीजणी नाचतायत. पण दोघींचा एकत्र डान्स नाहिये. दोन वेगवेगळे परफॉर्मन्स आहेत. अमृताचा सेन्शुअस डान्स असणार आहे. तर मुक्ताचा रोमँटिक डान्स असणार आहे.
दोघीजणी रिहर्सल्समध्ये व्यस्त असताना divyamarathi.comने दोघींनी गाठलं. मुक्ता तिच्या ‘डबलसीट’ चित्रपटातल्या गाण्यावर परफॉर्म करत होती. आणि नाचताना खूप मेहनतही घेत होती. मुक्ता म्हणाली, “ह्या अवॉर्ड नाइटमध्ये अमृता खानविलकर,सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत सारख्या चांगल्या डान्सर असणार आहेत. त्यांच्यासोबत नाचायचं, म्हणजे मेहनत तर केलीच पाहिजे,ना. मला नाचता येत नाही, पण तरीही मी अजिबात घाबरत नाही. उलट मला शिकवणाराच घाबरतो. त्यामूळे खूप सोप्या स्टेप्स मिळतात. रिहर्सल झालीय. आता स्टेजवर धमाल करणार. चुकले तर कोणी शिक्षा थोडीच करणार आहे. त्यामुळे नाचणं मी एन्जॉय करणार.”
अमृता सांगते, “महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा पुरस्कार जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून मी ह्या अवॉर्ड नाइटमध्ये नाचते. गेल्यावर्षी तर मला फेवरटे अभिनेत्री म्हणून अवॉर्डही मिळालं आहे. यंदा मी हिदी गाण्यांवर डान्स करणार आहे. राम चाहे लीला चाहे, इसक तू, मेहबूबा मेहबूबावर डान्स करणार आहे.”
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुक्ता आणि अमृताची रिहर्सल