आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ध्यानीमनी' असेल एकाच दिवशी भारतासह परदेशात डिजिटल रिलीज होणारा पहिला चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या जगभरात स्थायिक झालेल्या आणि होत असलेल्या भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा अनेक देशात भारतीय स्थायिक होत आहेत. पण त्याठिकाणी त्यांना दर्जेदार भारतीय चित्रपटांचा आनंद मनासारखा घेता येत नाही. 
 
बॉलीवूडचे बिग बजेट चित्रपट परदेशांत रिलीज होतात. पण प्रादेशिक भाषेतील चित्रपट किंवा कमी बजेटच्या पण दर्जेदार चित्रपटांपासून हे रसिक दूर राहतात. अशा रसिकांना जास्तीत जास्त भारतीय चित्रपटांचा आनंद लुटता यावा यासाठी इंग्लंडमधील मनोरंजन क्षेत्रातील कंपनी Indian Movie Friend ने एक स्टार्ट अप लाँच केले आहे. त्याच्या माध्यमातून ज्यादिवशी भारतात चित्रपट रिलीज होईल त्याचदिवशी परदेशातील एनआरआयना तो चित्रपट पाहता येणे शक्य होईल. विशेष म्हणजे नागरिकांना त्यांच्या हव्या त्या भाषेतील चित्रपटांचे पर्याय याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. 
 
व्हिडीओ ऑन डिमांच्या मॉडेलवर काम करणारे Indian Movie Friend हे सर्व भारतीय भाषांतील चित्रपटासाठीचे माध्यम असेल. विशेष म्हणजे हा प्लॅटफॉर्म तेवढाच सुरक्षितही असणार आहे. कमी बजेट असलेल्या चित्रपटांना थिएटर्सवर अवलंबून न राहता आता परदेशातील त्यांच्या प्रेक्षकापर्यंत या माध्यमातून पोहोचता येणार आहे. तसेच पायरसीवरही या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आळा घालता येणे शक्य आहे. 
 
या प्लॅटफॉर्मवर जगभरात रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट 'ध्यानीमनी' हा आहे. महेश मांजरेकर आणि अश्विनी भावे यांच्या अभिनयाने सजलेला आणि चंद्रकांत कुलकर्णींचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट आहे. चित्रपट प्रदर्शनाचा हा पर्याय अत्यंत फायदेशीर असल्याचे चित्रपटाचे सहनिर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर म्हणाले. 
 
काय आहे Indian Movie Friend
भारतीय चित्रपट जगभरात पोहोचवण्याचे व्हिजन घेऊन याची सुरुवात करण्यात आली होती. सध्या हा जगभरातील एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. जगभरात कुठेही भारतीय विविध भाषेतील चित्रपट पाहण्यासाठीचा हा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी 'कट्यार काळजात घुसली' आणि 'नटसम्राट'सारखे चित्रपटही या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...