आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दिल दोस्ती दुनियादारी\'च्या या सहा मित्रांची खास आहे \'मैत्रिची डिक्शनरी\', जाणून घ्या काय म्हणतायेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुखाच्या सुंदर क्षणात सोबत असणारी आणि दुःखाच्या हळव्या क्षणी खांद्यावर आधाराचा हात टाकणारी व्यक्ती म्हणजे आपला मित्र, सखासोबती. एकच मित्र तुझ्यासारखा.. अशा शब्दांमधून मित्रप्रेमाचा जिव्हाळा दाखवणारा दिवस म्हणजेच 'फ्रेंडशिप डे'. हे मैत्रीचे ऋणानुबंध आयुष्यभर असेच राहावे, यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण फ्रेंडशिप डे साजरा करत असतात. विशेष म्हणजे टीनएज मधील तरुणांच्या मैत्रीविषयी बोलायचे झाल्यास, या मुलांची मैत्रीची एक खास भाषा असते. त्याचा अर्थ प्रत्येकालाच समजतो असा नाही. मात्र त्या विशिष्ट ग्रुपला त्याचा अर्थ उमगतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, ''शेंडी लावणे'' या वाक्याचा शब्दशः अर्थ हा ''केस एकत्र बांधणे'' असा आहे. मात्र मैत्रीचा अर्थ हा ''फसवाफसवी करणे'' असा आहे. ही मैत्रीची खास डिक्शनरी आहे.
मैत्रिची अशीच खास डिक्शनरी तयार केली आहे,छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या आणि तरुणाईची मालिका म्हणून ओळखल्या जाणा-या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील सहा मित्रांनी. आशू, रेश्मा, कैवल्य, अॅना, सुजय, मीनल या सहा मित्रांनी तरुणाईच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मित्रांनी मैत्रिची एक डिक्शनरी तयार केली आहे.
आज खास फ्रेंडशिप डेचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या डिक्शनरीतील खास शब्दांची ओळख करुन देत आहोत. चला तर मग काय आहे त्यांच्या डिक्शनरी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(फोटो सौजन्यः झी मराठी)