आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‪ Marathi Serial Dil Dosti Duniyadari‬ Completes 1 Month With A Bang

\'दिल दोस्ती दुनियादारी\'ची यशस्वी माहपूर्ती, केक कापून केले सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(केक कापून सेलिब्रेशन करताना मालिकेतील कलाकार)

झी मराठीवरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली तरूणाईची मालिका म्हणजे 'दिल दोस्ती दुनियादारी'. या मालिकेने नुकताच एक महिना पूर्ण केला. या यशस्वी माहपूर्तीच्या क्षणी निर्माते संजय जाधव यांनी सर्व दोस्तांसाठी सेटवर केक पाठवला आणि सुजय, आशू, अॅना, मीनल, रेश्मा आणि कैवल्य सोबत टीममधील सर्वांनीच हा खास क्षण धम्माल पद्धतीने साजरा केला.
गेल्या महिन्यात म्हणजे 9 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायादिग्दर्शक संजय जाधव यांच्या ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हन या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
'दिल दोस्ती दुनियादारी'ची कथा घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची आहे. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे. घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे, ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. त्यांची स्वप्नं, त्यांची आव्हाने याची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळतेय.
पुढे पाहा, कलाकारांच्या सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...