आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ‪ Marathi Serial Dil Dosti Duniyadari‬ Completes 100 Episodes With A Bang

It\'s Party Time : \'दिल दोस्ती दुनियादारी\'ची शंभरी, सेटवर केक कापून झाले सेलिब्रेशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेल्फी क्लिक करताना सेलिब्रिटी आणि सेलिब्रेशनसाठी मागवण्यात आलेला खास केक)
अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली आणि तरुणाईची मालिका म्हणून ओळखल्या जाणा-या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेला आज म्हणजेच 3 जुलैला 100 भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेचे शंभर यशस्वी भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. सुजय, आशू, अॅना, मीनल, रेश्मा आणि कैवल्य सोबत टीममधील सर्वांनीच हा खास क्षण धम्माल पद्धतीने साजरा केला. यावेळी सर्वांनी सेल्फीचीही हौस भागवली.
यावर्षी 9 मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘दुनियादारी’ फेम दिग्दर्शक आणि प्रसिद्ध छायादिग्दर्शक संजय जाधव यांच्या ड्रिमिंग ट्वेंटी फोर सेव्हन या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
'दिल दोस्ती दुनियादारी'ची कथा घरापासून दूर राहणा-या सहा मित्र मैत्रिणींची आहे. कैवल्य, आशुतोष, सुजय, अॅना, मीनल आणि रेश्मा असे हे सहा जण एकत्र आलेय स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईत. यातील प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने मुंबईत आलेला आहे. यात कुणाचा करिअरचा स्ट्रगल आहे तर कुणाचा काही तरी फॅमिली प्रॉब्लेम आणि हा स्ट्रगलच या सर्वांमधील एक समान धागा आहे.
घरापासून आणि कुटुंबापासून दूर आलेल्या या सहा जणांचं एक नवं कुटुंब तयार झालं आहे, ज्यात मैत्री, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि सोबतच धम्माल, मजा मस्तीही आहे. यातील प्रत्येकाने उराशी जोपासलंय एक स्वप्न. विविध स्तरातून आणि पार्श्वभूमीतून आलेला हा प्रत्येकजण आपापली स्वप्नं साकार करण्यासाठी या शहरात आलाय जिथे पावलापावलावर आहेत नवे अडथळे, नवी आव्हाने आणि नवे संघर्ष. या संघर्षांना एकमेकांच्या साथीने तोंड देत सगळे निघालेयत अंतिम ध्येयाच्या दिशेने. त्यांची स्वप्नं, त्यांची आव्हाने याची गोष्ट या मालिकेत प्रेक्षकांना बघायला मिळतेय.
पुढे पाहा, कलाकारांच्या सेलिब्रेशनची खास छायाचित्रे...