आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल दोस्ती दुनियादारी’ला होताहेत १०० भाग पूर्ण, सेटवर सेलिब्रेशनची रंगीत तालीम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिल दोस्ती दुनियादारी'चे कलाकार
येत्या ३ जुलैला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेला १०० भाग पूर्ण होत आहेत. आणि त्याच दिवशी या मालिकेतला ‘कैवल्य कारखानिस’ म्हणजेच अभिनेता अमेय वाघचा ‘शटर’ हा चित्रपट रिलीज होतोय. त्यामुळे अमेयसाठी हा आहे, दुग्धशर्करा योग.
अमेय वाघ सध्या खूप खुशीत आहे. तो म्हणतो, “मी कधी विचारही केला नव्हता की, मी एकाचवेळी अशा दोन टोकाच्या भूमिकेत दिसेन. सध्या माझ्या करीयरच्या एका चांगल्या वळणावर मी उभा आहे, असेच मला वाटते. शेवटी एका अभिनेत्याला असंच काहीसं तर हवं असते. ‘दिल दोस्ती दुनियादारी’मूळे तर माझं आयुष्यच बदललं. खूप फॅन फॉलोविंग मिळाली. आणि सध्या तर मी प्रमोशनमध्ये फिरतो आहे, तेव्हा तर लोकं खूप भरभरून बोलत आहेत. इतरवेळी सूध्दा जेव्हा लोकं भेटतात, किंवा चाहते कॉन्टॅक्ट करतात, तेव्हा भरभरून बोलतात, ‘तुमची भूमिका खूप आवडते’, असं म्हणतात. आमच्या वयाच्या तरूणांनाच नाही, तर लहान मुलांनाही आमची मालिका खूप आवडते, हे विशेष. एवढंच नाही तर अगदी मोठी माणसंही येऊन सांगतात, की तुम्हांला पाहून आम्हांला आमचे कॉलेजचे दिवस आठवले. अनेकदा प्रेक्षक सेटवरही भेटायला येतात. आणि येताना आमच्याच सारखे कपडे घालून येतात, तेव्हा मजा वाटते.”
दिल दोस्ती दुनियादारी एवढी हिट होण्याच्या संदर्भात बोलताना अमेय पूढे सांगतो,”ही मालिका लोकांना सच्ची वाटते. या मालिकेत इतर मालिकांसारखी भरजरी कपड्यातली किंवा लाऊड मेकअप मधली पात्र नाही आहेत. तर कधी तोंडात टूथब्रश ठेवून बोलणारी, कधी झोपून एकमेकांशी गप्पा मारणारी, अगदी शॉर्ट्स-बनियन घातलेली पात्र दिसतात. जी प्रेक्षकांना आपलीशी वाटतात.”
पूढील स्लाइडमध्ये वाचा, अमेय वाघ का बनला रिक्षावाला?