तरुणाईची मालिका असलेल्या 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेत स्वच्छंदी आयुष्य जगणारा आशू अर्थातच अभिनेता पुष्कराज चिरपुटकर 6 सप्टेंबर रोजी वयाची 29 वर्षे पूर्ण केली आहेत. 6 सप्टेंबर 1986 रोजी पुण्यात त्याचा जन्म झाला. 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर पुष्कर अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. दाढी-मिशीतील त्याचा लूक तरुणाईला आवडला आहे.
मात्र पुष्कर खासगी आयुष्यात कसा आहे, त्याची 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतील निवड कशी झाली, याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? काय म्हणता नाही... चला तर मग तुमची उत्सुकता फार ताणून न धरता आम्ही तुम्हाला हा आशु कोण आहे, ते सांगतो.
अभिनेता पुष्कराज चिरपुटकरविषयी...
मालिकेत आशुतोष उर्फ आशू ही व्यक्तिरेखा साकारणारा पुष्कराज चिरपुटकर मुळचा पुण्याचा आहे. 2008 मध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. पुष्कराज पुण्याच्या एका थिएटर ग्रूपसोबत प्रायोगिक नाटक करत होतो. त्या नाटकाच्या माध्यमातून त्याला 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या ऑडिशनसाठी विचारणा झाली. त्यानंतर रीतसर ऑडिशन आणि इतर प्रक्रिया पूर्ण करून त्याची या मालिकेसाठी निवड झाली. या मालिकेपूर्वी पुष्कराजने काही कार्पोरेट अॅड फिल्म्स आणि शॉर्ट फिल्म्ससाठी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शिवाय पुण्यात इंग्लिश थिएटर आणि प्रायोगिक नाटकात तो काम करतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अभिनेता पुष्कराजची आत्तापर्यंत न पाहिलेली खास छायाचित्रे...