आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dil Dosti Duniyadari Rock Concert, Tv Serial To Bid Adieu Next Month

‘दिल दोस्ती दुनियादारी’ची Rock Concert, मालिका संपण्याचं कैवल्य-मीनलला दु:ख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिल दोस्ती दुनियादारी’ची रॉक कॉन्सर्ट नुकतीच मुंबईजवळ डोंबिवलीत आयोजित केली होती. माजघरातल्या ह्या सहा फ्रेंड्सना पाहायला डोंबिवलीच्या आसपास राहणा-या युवावर्गाने गर्दी केली होती. ‘दिल चाहता है’, ‘पानी दा रंग’, ‘कुछ तो हुआ है’, ‘यारों दोस्ती बडी ही’, ‘आजा आजा दिल निचोडे’, ‘मेरा जी करदा’ अशा कैवल्य, सुजय आणि मीनलने गायलेल्या पॉप्युलर गाण्यावर तरूणाईने ठेका धरला. तर एना आणि रेश्माच्या डान्स परफॉर्मन्सला टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद मिळत होता.
ही कॉन्सर्ट जेवढी डोंबिवलीकरांना आठवणीतली राहिली. तेवढीच ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या संपूर्ण टीमसाठी ही मेमरेबल ठरली. कॉन्सर्टविषयी सांगताना अभिनेता अमेय वाघ म्हणतो, “आम्ही खूप धमाल केली. एवढं गायलो, नाचलो, ओरडलो, की कॉन्सर्टनंतर आता प्रचंड दमलोय. जमलेल्या क्राउडचा उत्साह आम्हांला एनर्जी देत होता. आमच्या शोचा युएसपीच आहे, की ही मालिका यंगस्टर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यामुळेच रॉक कॉन्सर्टला तरूणाईने खूप गर्दी केली होती. त्यांचे हसरे, उत्साही चेहरे आमचा परफॉर्मन्स अधिक दमदार बनवायला कारणीभूत ठरत होते. कॉन्सर्टमध्ये मी गाताना प्रेक्षकांमध्ये गेलो. तर माझ्याशी हात मिळवायला, सेल्फी काढायला सगळे लगेच पूढे सरसावायचे.”
स्वानंदी टिकेकर म्हणते, “हो ना, पहिल्यांदा मुंबईत कॉन्सर्ट करत होतो. आम्हांला पाहिल्यावर प्रेक्षकांच्या डोळ्यातली चमकच आमचा उत्साह वाढवत होती. सगळे आम्हांला पाहून खूप एक्साइट झाले होते. चाहत्यांनी आम्हांला कौतुकाने भेटवस्तूही दिल्या. आमच्या सगळ्यांच्या नावांचा एक गणपती बनवून एकाने आम्हांला ते पेटिंग गिफ्ट केलंय. तर अजून काही भेटवस्तू उघडायच्यात. कॉन्सर्टनंतर जरी दमलो असलो तरी कॉन्सर्टमध्ये खूप मजा आली.”
‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याचीही घोषणा ही कॉन्सर्ट संपताना करण्यात आली. त्याविषयी स्वानंदी म्हणते, “ही मालिका आता निरोप घेणार अशी अनाउन्समेन्ट आम्ही कॉन्सर्ट संपल्यावर केली. आणि अचानक प्रेक्षकांमध्ये दोन मिनीटं शांतता पसरली. मग ही मालिका बंद करू नका. अशी ओरड सुरू झाली. त्या प्रेक्षकांना मग सुव्रतने मालिका परत येणार असल्याचं आश्वासन दिलं. दुसरा सिझन चालू होणार असल्याचीही बातमी दिली.”
पुढील स्लाइडमध्ये वाचा काय आहेत, ‘दिल दोस्ती दुनियादारी’चं पहिलं पर्व संपताना कलाकारांच्या प्रतिक्रिया
(फोटो - स्वप्निल चव्हाण)