‘दिल दोस्ती दुनियादारी’चे कैवल्य आणि आशु यंदा ‘झीमराठी अवॉर्ड्स’चे सूत्रसंचालन करणार हे गेल्या काही दिवसात ‘झी मराठी’वर सुरू असलेल्या प्रोमोमूळे समजलंच आहे. कैवल्य आणि आशु एकत्र म्हणजे धमाल मस्ती होणार, हे तर ओघानेच आलं. कैवल्य आणि आशूने आपल्या संपूर्ण एनर्जीसह थट्टा-मस्करी करत ‘झी मराठी अवॉर्ड्स’चे Anchoring केले.
ह्या सूत्रसंचानाच्या दरम्यान त्यांनी एक स्किटही केले. कैवल्य ‘राजा’ बनला तर आशु ‘प्रधानजी’ बनला. आणि मग सगळ्या मालिकांची टेर खेचणं सुरू झालं.
मालिकांना आकाशगंगेतल्या वेगवेगळ्या ता-यांची त्यांनी नावंही ठेवली.
होम मिनीस्टर - सूर्य
नांदा सौख्य भरे – ध्रुव तारा
होणार सून मी ह्या घरची – पृथ्वी
का रे दुरावा – चंद्र
दिल दोस्ती दुनियादारी – सप्तर्षी
एकिकडे आशू आणि कैवल्य सूत्रसंचालन करून आपलं घरभाडं सोडवण्यासाठी काम करण्यात व्यस्त होते. तर दुसरीकडे रेश्मा तिचे ‘पेटंटं’ पोहे बाहेरच्या स्टॉलवर विकून पैसे कमवतं होती. आणि बाहेर दुस-या स्टॉलवर आशु-कैवल्यच्या सूत्रसंचालनाला कंटाळलेल्या स्टार्सना सुजय पाच रूपयात डोकेदुखीवर अक्सिर इलाज म्हणून बाम विकत होता.
पण ह्या सगळ्यानंतर खरी धमाल आली, जेव्हा ह्या सहाही मित्रांच्या दोस्तीची दुनियादारी मंचावर पाहायला मिळाली. फिल्ममेकर संजय जाधवचीच मालिका असल्याने संजय जाधवच्याच दुनियादारी चित्रपटातल्या मैत्रीवरच्या ‘जिंदगी जिंदगी’ ह्या गाण्यावर सहा जणांनी परफॉर्मन्स केला. त्याचप्रमाणे ‘बालक पालक’ मधल्या ‘करूया आता कल्ला कल्ला’ ह्या गाण्यावरही परफॉर्म करून धमाल आणली.
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काय म्हणतायत आशु,कैवल्य,रेश्मा,सुजय आणि मिनल ह्या परफॉर्मन्सनंतर