आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dil Dosti Duniyadari Team Meets Swapnil Joshi And Sai Tamhankar

‘दिल दोस्ती..’च्या टीमची स्वप्निल-सईसोबत ‘दुनियादारी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्नीेल जोशीने काढले, 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या टीमसोबत फोटो
संजय जाधव दिग्दर्शित, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर स्टारर ‘दुनियादारी’ ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यावर, संजयने ‘दिल,दोस्ती,दुनियादारी’ ही मालिका स्मॉल स्क्रिनवर सुरू केली. ह्या सुध्दा ‘दुनियादारी’ला प्रेक्षकांचे सध्या अमाप प्रेम मिळतेय. आणि नुकताच सिल्व्हर स्क्रिनवरच्या आणि स्मॉल स्क्रिनवरच्या ‘दुनियादारी’च्या स्टार्सना एकत्र पाहण्याचा योग आला, संजय जाधवच्या ‘तू हि रे’ चित्रपटाच्या फस्ट लूक लाँचवेळी.
‘दिल दोस्ती दुनियादारी’चे आशु, रेशमा, केके, एना आणि सुजय पाचही जणं संजयच्या ‘तूहिरे’ फिल्मच्या लाँचवेळी आले. आणि त्यांनी स्वप्नील,सई आणि संजयसोबत भरपूर फोटोही काढले. खरं तर संजय जाधवसाठी सध्या दुहेरी आनंदाचा योग जुळून आलाय. एक तर, ‘दिल दोस्ती..’चे १०० भाग नुकतेच पूर्ण झालेत. आणि आता पाठोपाठ सई-स्वप्नील स्टारर फिल्मचा फस्ट लूकही अनवेल झाला.
यावर ‘दिल दोस्ती दुनियादारी’चा निर्माता संजय जाधव म्हणतो, “हो, ना खूपच चांगलं वाटतंय. आणि मालिकेला १०० भाग झाल्यावर आता आम्ही पार्टी मूडमध्येही आहोत. फक्त मी ‘तू हि रे’च्या पोस्ट प्रॉडक्शनच्या गडबडीत मागच्या आठवड्यात एवढा व्यस्त होतो की, सेटवर झालेल्या छोटेखानी सेलिब्रेशनला उपस्थित राहू शकलो नव्हतो. पण आता लवकरच जंगी पार्टी होणार.”
मालिकेतली मीनल म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या मुंबईत नाही आहे. ती अमेरिकवरून परत आल्यावर मग सेलिब्रेशन करायचा मालिकेतल्या कलाकारांचा प्लॅन आहे. याबाबत बोलताना सखी गोखले सांगते,”खरं तर शंभर एपिसोड बघता बघता कधी पूर्ण झाले आम्हांलाही कळले नाही. १०० झाल्यावर मग लक्षात आलं की, अरे खूप एपिसोड्स झाले. आणि आम्ही तर सेटवर नेहमीच एकत्र असतो. नेहमीच हँगआउट करतो. त्यामुळे वेगळ्या सेलिब्रेशनचा विशेष काही प्लॅन केलाच नाही. आणि आज स्वप्नील-सई-संजयदादा ह्या तिघांनाही आमच्या बेस्ट विशेश द्यायला आलोय. ‘तू हि रे’चा फस्ट लूक लाँच ही संजयदादासाठी खास गोष्ट आहे. त्यामुळे आमचं इथे येणं तर मस्टच होतं.”
पूढील स्लाइडमध्ये वाचा, मालिकेचं यश साजरं करायची आशुची वेगळीच शक्कल