आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friendship Day SPL: दिल दोस्तीच्या ‘रॉकस्टार्स’ची कॉन्सर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिल दोस्ती दुनियादारी'च्या रॉकस्टार्सची झाली कॉन्सर्ट
‘दिल दोस्ती दुनियादारी ही सध्या तरूणवर्गात लोकप्रिय असलेली, क्रेझी मालिका आणि ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ असा मैत्रीचा नवा फंडा सांगणारी मालिकेतील दोस्तांची गॅंग’ तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनलीय. पुणेकरांना ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या सुजय, कैवल्य, आशुतोष, अॅना, मीनल आणि रेश्मा या गॅंगला भेटायला मिळालं, पुण्यात नुकत्याच झालेल्या रॉक कॉन्सर्टमूळे.
सारेगमपच्या मागच्या पर्वाची विजेती जुईली जोगळेकरच्या‘अगम्य बॅंड’च्या सोबतीने ‘दिल दोस्ती..’मधल्या कलाकारांनी एक मस्त रॉक कॉन्सर्ट केली. या रॉक कॉन्सर्टचं निवेदन केलं सर्वांच्या लाडक्या आशूने. मालिकेमध्ये कैवल्यचं पात्र हे एका रॉकस्टारचं आहे त्यामुळे त्याच्या परफॉर्मन्सबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. मग कैवल्यनेही ‘यारो दोस्ती बडीही हसीन है’ हे गाणं गाऊन सर्वांची मने जिंकली.
प्रेक्षकांसाठी ख-या अर्थाने सरप्राईज परफॉर्मन्स ठरला तो मीनल आणि सुजयचा. मीनल ने ‘अब के सावन ऐसे बरसे’ हे गाणं गाऊन आपल्या गायनाने सर्वांना चिंब भिजवलं…. तर ‘डुबा डुबा रहता हूँ’ हे गीत सादर करून सुजयने सर्वांना एका अनोख्या विश्वात नेलं. याशिवाय अॅना आणि रेश्माने निवेदनात आशूला सोबत तर दिलीच शिवाय काही गाणीही सादर करून रसिकांसोबत ठेकाही धरला. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो सादर झालेलं शेवटचं गाणं. ‘पट्टाखा गुड्डीहो’ आणि ‘पुरा लंडन ठुमकदा’ या गाण्यावर सर्वच कलाकारांनी रंगमंचाच्या खाली उतरून आणि प्रेक्षकांमध्ये मिसळून ठेका धरला आणि जमलेल्या सगळ्यांना नाचायला भाग पाडलं.
मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरीही सायकलवरून ‘डबलसीट’ येत ह्या कॉन्सर्टमध्ये ‘दिल दोस्ती’च्या रॉकस्टार्ससोबत धमाल करायला आले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या रॉकस्टार्सचा परफॉर्मन्स