आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बापजन्म'मधून वसंतराव देशपांडेंची नात दीप्तीचे पार्श्वगायनात पदार्पण, बघा गाण्याचा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निपुण धर्माधिकारी याचा बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. 'बापजन्म' या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटे ही पार्श्वगायनात पदार्पण करत आहे. हा तीचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. 'बापजन्म' चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ असे शब्द असणारे गाणे दीप्ती माटे यांनी गायले आहे. गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून असून संगीत दिग्दर्शक गंधार संगोराम यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
 
दीप्ती माटे या प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात आणि आघाडीचा तरूण शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची बहीण आहेत. मराठी नाट्यसृष्टीत संगीत नाटकांमधून दिसणाऱ्या दीप्ती यावेळी ‘बापजन्म’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण करत आहेत.
 
पुढे वाचा, चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केल्याचा कसा होता दीप्तीचा अनुभव आणि सोबतच शेवटच्या स्लाईडवर बघा, गाण्याचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...