आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Director Mangesh Hadvale's Film Festival In America

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेत होतोय मंगेश हाडवळे यांच्या चित्रपटांचा महोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टपाल, टिंग्या आणि देख इंडियन सर्कस या सिनेमांचे पोस्टर)

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या कामाची दखल अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी माणसांनी घेतली आहे. मंगेश यांच्या 'टिंग्या' (मराठी)'देख इंडियन सर्कस' (हिंदी) आणि येत्या 26 सप्टेंबर रोजी रिलीज होणा-या 'टपाल' या तीन चित्रपटांचा महोत्सव 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील महत्वाच्या शहरांत आणि शिकागोमध्ये होत आहे. या तिन्ही चित्रपटांनी यापूर्वीच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे 'टिंग्या' आणि 'देख इंडियन सर्कस' या दोन्ही चित्रपटांसाठी मंगेश हाडवळे यांनी राष्ट्रीय पुरस्कारावरसुद्धा आपली मोहोर उमटवली आहे.
अमेरिकेत होणा-या महोत्सवाविषयी मंगेश यांनी सांगितले, "माझ्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा महोत्सव आहे. कारण मी अमेरिकेतसह इतर अनेक देशांत यापूर्वी गेलो आहे, मात्र फक्त माझ्याच चित्रपटांचा महोत्सव पहिल्यांदाच होत आहे. तेव्हा ही आपणा सर्वांसाठीच सन्मानाची गोष्ट आहे."
अमेरिकेत स्थायिक झालेले मराठी उद्योजक श्रीनिवास ठाणेदार यांच्या संकल्पनेतून हा चित्रपट महोत्सव साकारत आहे. ठाणेदार यांनी हे सर्व चित्रपट पाहिले आहेत. या कलाकृती अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी प्रेक्षकांना बघता याव्यात यासाठी त्यांनी मंगेश यांच्याकडे ही इच्छा व्यक्त केली आणि त्यांना अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले. अमेरिकेत स्थायिक असलेल्या मराठी लोकांच्या मराठी यू.एस. ए या संस्थेच्या अंतर्गत हा चित्रपट महोत्सव साजरा होणार आहे.