आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडे नंतर आता महेश काळे... जाणून घ्या काय आहे खास कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फँड्री-सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे, 'ख्वाडा' चित्रपटाचे भाऊ क-हाडे आणि 'घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे - Divya Marathi
'फँड्री-सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे, 'ख्वाडा' चित्रपटाचे भाऊ क-हाडे आणि 'घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे
एक काळ होता, मराठी चित्रपटसृष्टीवर मुंबई-पुणे-कोल्हापूरचे राज्य होते. निर्माते, दिग्दर्शक, कलावंतांबरोबर सिनेक्षेत्रातील इतर मंडळीही इथलीच होती. त्यात तमाशाप्रधान, कौटुंबिक आणि विनोदी फार्स असलेल्या चित्रपटांचा भरणा जास्त होता. पण, अलिकडच्या काळात महाराष्ट्राच्या विविध ग्रामीण भागातून सामाजिक समस्यांकडे डोळसपणे पाहणारे, उत्तम वैचारीक बैठक असलेले आणि मनोरंजकतेची व सिनेतंत्राची उत्तम जाण असलेले तरूण सिनेसृष्टीत आपलं नाणं खणखणीत असल्याचं सिद्ध करत आहेत. यात प्रामुख्याने नाव घ्यावे लागेल ते दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि भाऊ कऱ्हाडे यांचे. 
 
एकाच कॉलेजमध्ये शिकले नागराज, भाऊ कऱ्हाडे आणि महेश काळे... 
अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलेल्या नागराज मंजुळे आणि भाऊ कऱ्हाडे या दोघांनी मराठी चित्रपटसृष्टीला आपल्या गावरान ठसक्याने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. स्थानिक सामाजिक प्रश्नांना सिनेमाच्या माध्यमातून वाचा फोडताना, दोघांनिही आपल्या कलाकृतीतून प्रेक्षकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले आहे. आता याच अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयाच्या मास कम्युनिकेशनचा तिसरा विद्यार्थी, दुरावस्था झालेल्या शालेय शिक्षण व्यवस्थेमुळे संभ्रमात असलेल्या पालकांच्या डोळ्यात
झणझणीत अंजन घालायला सज्ज झाला आहे. त्याचे नाव आहे महेश रावसाहेब काळे.
 
पुढे वाचा, कशी रोवली गेली 'घुमा'ची मुहूर्तमेढ... का विकावी लागले महेश काळे यांच्या वडिलांनी शेती आणि गायी... यांसह बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...