आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Director Sachin Kundalkar Making Marathi Film Rajwade And Sons

सचिन कुंडलकर घेऊन येतोय नवा सिनेमा ‘राजवाडे अॅंड सन्स’, पाहा On Locationची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून - अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सचिन कुंडलकर, सचिन खेडेकर)
मुंबई : ‘हॅपी जर्नी’च्या यशानंतर आता दिग्दर्शक सचिन कुंडलकर आणखी एक चित्रपट लवकरच घेऊन येत आहे. नुकतेच त्याच्या नव्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून याही चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णी झळकणार असून ‘राजवाडे अॅंड सन्स’ असे या चित्रपटाचे नाव आहे. मात्र या चित्रपटाचे कथानक अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. ‘हॅपी जर्नी’मध्ये एक नितांत सुंदर भावाबहिणीची कथा साकारल्यानंतर सचिन कुंडलकर यांनी हाती घेतलेला हा नवा चित्रपटही अतुलचीच भूमिका असणारा चित्रपट असल्याने एकाच दिग्दर्शकाकडे किमान दोन ते तीन चित्रपट करायचा पायंडाच अतुलने पाडल्यासारखे आहे.
सतीश राजवाडे यांच्याबरोबरही अतुलने ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘पोपट’ असे दोन चित्रपट केले होते. आता सचिन कुंडलकरबरोबरही अतुलचा ‘राजवाडे अॅंड सन्स’ हा दुसरा चित्रपट असणार आहे. ‘हॅपी जर्नी’साठी अतुलने वयाच्या पन्नाशीत आपला लुक बदलत तरुण दिसण्याचा प्रयत्न केला होता. आता ‘राजवाडे अॅंड सन्स’मध्ये अतुलचा लुक कसा असणार आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. या सिनेमात अतुलसह मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, ज्योती सुभाष यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे समजते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'राजवाडे अॅंड सन्स'च्या ऑन लोकेशनची छायाचित्रे...