आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

It\'s Party Time:पाहा सई-स्वप्निलसह सेलिब्रिटींनी केली, संजय जाधवच्या बर्थडेला मस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय जाधवच्या बर्थडे पार्टीचे फोटो
दिग्दर्शक संजय जाधवचा वाढदिवस नुकताच विकेन्डला झाला. आणि त्याच्या आवडत्या अभिनेते आणि अभिनेत्रींनी तो संजयसाठी आणि त्यांच्यासाठी आठवणींतला ठरावा यासाठी मस्त सेलब्रेशनही केलं. हर्षदा खानविलकर, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, अमितराज, उमेश जाधव या संजय जाधवच्या जवळच्या सेलिब्रिटी फ्रेंड्ससोबतच त्याच्या प्रॉडक्शनच्या टिमनेही खूप धमाल केली.
संजय जाधवचं वैशिष्ठ्य आहे, की तो त्याच्या चित्रपटाच्या सेटवर असो की मग एखाद्या कार्यक्रमात नेहमी त्याच्या सिग्नेचर बर्मुडा ट्राउझर्समध्येच असतो. आणि त्याच्या मित्रांनीही मग त्याच्या बर्थडे केकवर संजयच्या नावाच्या SJ या इनिशिअलसोबतच जंगबुकच्या गाण्याची लोकप्रिय ओळ लिहीली. ‘चड्डी पहनके फुल खिला हैं.’ या केककडे पाहून संजयही गालातल्या गालात हसत होता. पार्टीमध्ये जंगबूकचं पोस्टरही त्याला बर्थडे विश करण्यासाठी लावलं होतं.
आपल्या लाडक्या संजयदादाच्या पार्टीला सगळेच ‘रॉकस्टार’ फार उत्साहित होते. आणि जिथे एन्टरटेनर असतात, तिथे बरेच एन्टरटेनिंग एक्टही होतात. संजयच्या काही आठवणी, तर कधी त्याची खोडी काढणारी, त्याची मस्करी करणारी एक्टही कलाकारांनी सादर केली. आणि पार्टीत रात्री उशीरापर्यंत धमाल उडवून दिली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सई-संजय-स्वप्निल-तेजस्विनीची धमाल