आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doing Serial On Lord Shankar And Ganpati, Is God\'s Blessing, Says Mahesh Kothare

‘शंकरावर मी, आणि बाप्पावर माझ्या मुलाने मालिका करणं, हा तर दैवी संकेत’, महेश कोठारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या पौराणिक मालिकांना प्रेक्षकांची जास्त पसंती मिळतेय. त्यात Vfxचा वापर करत मालिका हायटेक बनवली तर लहानथोर सर्वांनाच ती मालिका आवडते, हे महेश कोठारे ह्यांच्या ‘जय मल्हार’ मालिकेने दाखवलेच आहे. आता ‘जय मल्हार’च्या यशानंतर कोठारे ‘कलर्स मराठी’वर मंगळवारपासून ‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका घेऊन आलेत. मालिका सुरू झाल्यापासून छोट्या गणपती बाप्पाच्या गोंडस रूपाने सर्वांना आकर्षित केलंय.
पहिल्या भागात सर्वांना गणपती बाप्पाचं दर्शन घडवल्यावर महेश कोठारेंनी देवळात जाऊन गणेशपूजन आणि हवन करून बाप्पाचे आशिर्वाद घेतले. सोबत कलर्स मराठीचे अनुज पोतदार, संजय उपाध्याय आणि वाहिनीची टीम होतीच. पण ‘तू माझा सांगाती’, ‘माझिया माहेरा’, ‘कमला’, ‘असं सासर सुरेख बाई’ मालिकेचेही कलाकार पूजाला उपस्थित होते.
‘गणपती बाप्पा मोरया’चा क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, आदिनाथ कोठारे. विशेष म्हणजे, शंकराचं रूप असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या चरित्रावर आधारित ‘जय मल्हार’ मालिका करण्याचं शिवधनुष्य जसं महेश कोठारेंनी उचललं. तसंच आता शंकराचा मुलगा असलेल्या गणपती बाप्पावर मालिका करताना क्रिएटीव्हली त्यात मेहश कोठारेंचा मुलगा आदिनाथचा सहभाग आहे.
शंकराच्या मालिकेत महेश कोठारेंचा सहभाग आणि गणपतीच्या मालिकेत आदिनाथचा सहभाग हा योगायोग विधात्यानेच घडवून आणला, असं महेश कोठारेंचं म्हणणं आहे. ते म्हणतात “खरं तर हा योगायोग, तुम्ही सांगेपर्यंत माझ्या लक्षातच आला नव्हता. पण आता ह्याला मी दैवी संकेत म्हणेन. कारण खरं तर आदिनाथने ‘गणपती बाप्पा मोरया’सोबत सहभागी होण्याचं आमच्या कुठेच डोक्यात नव्हतं. ‘जय मल्हार’ यशस्वी झाल्यावर ‘कलर्स मराठी’ने मला त्यांच्यासाठी बाप्पावर मालिका करण्याविषयी सुचवलं. मी त्याविषयी तयारी सुरू केल्यावर माझ्या लक्षात आलं, एकावेळी दोन पौराणिक मालिका करणं माझ्यासाठी अवघड आहे. माझी ही चिंता आदिनाथच्या लक्षात आल्यावर त्याने आपणहून ‘गणपती बाप्पा..’ मालिकेची जबाबदारी घेतली. आणि हा योगायोग जुळून आला.”
आदिनाथ कोठारेची क्रिएटीव्ह डायरेक्टर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो म्हणतो, “कदाचित बाप्पाची कृपा आमच्यावर असावी, की, मालिका सुरू होताना अनेक अडथळे आले, पण विघ्नहर्त्याने ते दूर केले. मला ह्यात आपण होऊन सहभागी व्हायची बुध्दी दिली. क्रिएटीव्ह डायरेक्टर होऊन मालिका सांभाळण्याचा पहिलाच अनभव असाताना तोच ह्यातून मार्ग काढायला मला हात देतोय. आणि कलर्सनेही कुठे बजेटच्या बाबतीत मागे पुढे पाहिलं नाही. त्यामूळे एकूणच सुरूवात चांगली झालीय. म्हणूनच त्याचीच पूजा करून त्याचे आशिर्वाद घेतले.”
(फोटो - अजित रेडेकर)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल दुसानिस काय म्हणतायत मालिकेबद्दल