आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येऊ द्या\'च्या सेटवर झाले डॉ. निलेश साबळेचे B\'day सेलिब्रेशन, पाहा फोटोज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('चला हवा येऊ द्या'च्या टीमसोबत डॉ. निलेश साबळे)

मुंबईः छोट्या पडद्यावरील गाजत असलेला शो म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. डॉ. निलेश साबळेच्या खुमासदार सुत्रसंचालनाने हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. या शोमुळे निलेशलासुद्धा भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. निलेशशिवाय या शोची कल्पनाच प्रेक्षक कदाचित करु शकणार नाहीत. प्रेक्षकांचाच नव्हे तर 'चला हवा येऊ द्या'च्या संपूर्ण टीमचा निलेश लाडका आहे. म्हणूनच या शोच्या संपूर्ण टीमने जल्लोषात निलेशचा वाढदिवस साजरा केला.
30 जून रोजी निलेशचा वाढदिवस होता. याचेच औचित्य साधत जल्लोषात टीमने त्याचे बर्थडे सेलिब्रेशन केले. यासाठी खास केक त्यांनी मागवला होता. सोशल साइटवर शेअर झालेल्या छायाचित्रांमध्ये टीमसोबत निलेश जल्लोष करताना दिसतोय.
निलेशच्या बर्थडे सेलिब्रेशनची खास झलक तुम्हाला पुढील स्लाईड्समध्ये बघता येईल.