आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेते डॉ. गिरीश ओक यांचं सामान विश्रामगृहातून बाहेर फेकले, कलाकारांनी व्यक्त केला निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्या गोजिरवाण्या घरात, या सुखानों, जुळून येती रेशीमगाठी, पसंत आहे मुलगी यांसह अनेक मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक आणि ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्यासोबत सिंधुदुर्ग येथे अतिशय अपमानास्पद घटना घडली आहे. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाच्या प्रयोगासाठी ते सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये दाखल झाले होते. यावेळी राहाण्यासाठी शासकीय विश्रामगृहाचा पर्याय त्यांनी निवडला होता. रात्री नियोजित प्रयोगासाठी ते बाहेर निघून गेले. प्रयोग संपल्यानंतर रात्री ते विश्रामगृहावर आल्यावर त्यांना सामान बाहेर फेकून देण्यात आलेले दिसले.
 
यासंदर्भात त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या कर्मचा-यांना विनापरवानगी सामान बाहेर फेकण्याविषयी विचारले असता, जिल्ह्याच्या सीईओंच्या नातेवाईकांना रुम हवी असल्याने तुमचे सामान बाहेर काढण्यात आले असल्याचे त्यांना उत्तर मिळाले. इतकेच नाही तर तुम्ही एका दिवसासाठी येणार मात्र आम्हाला अधिका-यांना कायम उत्तर द्यावे लागते असे त्यांना सांगण्यात आले.
 
नाट्यकलावंतांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा आम्ही इथे कशाला यायचे? असा सवाल केला आहे. डॉ. गिरीश ओक आणि रवी पटवर्धन यांच्यासह यावेळी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष जयंत साळगावकर, अविनाश खर्शिकर आणि स्त्री कलावंत होते. मध्यरात्री अडीचच्या सुमारास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या नातेवाईकांच्या नावे आरक्षण असल्याचे कारण सांगत विश्रामगृहाच्या कर्मचा-यांनी या सर्व कलाकारांच्या बॅगा बाहेर काढल्या.  
 
पुढे वाचा, मराठी कलाकारांनी व्यक्त केला निषेध...
 
 
बातम्या आणखी आहेत...