आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Photos: डॉक्टरी सोडून भारतात अभिनयासाठी परतले होते श्रीराम लागू, \'पिंजरा\' ठरला होता मैलाचा दगड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू आज त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या श्रीराम लागू यांना आजपर्यंत त्यांच्या मराठी तसेच हिंदी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी अनेकवेळा सन्मान करण्यात आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी काही खास माहिती आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.  

 

नाटकातल्या पहिल्या कामाची आठवण झाली तरी त्यांचा थरकाप उठतो. पहिली चार वर्षे ते म्यूनिसीपल शाळेत होते. त्यानंतर ते इंग्रजी शाळेत ते पहिलीतच होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शिक्षिकेने नाटिकेत काम करण्यास सांगितले. त्यात त्यांनी गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका साकारली होती. तालीम केली आणि त्यानंतर या नाटकादरम्यान श्रीराम लागू त्यांचा पूर्ण संवाद विसरुन गेले. समोर बसलेल्या प्रेक्षकांना पाहून ते फार घाबरले. त्यावेळी त्यांनी स्टेजवरच जायला नकार दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या सरांनी स्टेजवर अक्षरशः फेकले. त्यावेळी सर्वांना पाहून ते फारच घाबरले. पण थोड्या वेळाने त्यांना भाषण आठवले आणि त्यांनी केवळ त्यांचे डायलॉग्ज नाही तर पूर्ण एकांकिका बोलून टाकली. त्यानंतर त्यांनी कधीही स्टेजवर जाणार नाही ही प्रतिज्ञा घेतली. 

 

भीतीवर केली मात..
शाळेच्या गॅदरींगमध्ये माजी विद्यार्थ्यांची नाटक व्हायची. ते फारच सुंदर होत असत. दरवर्षी ते नाटक पाहत आणि त्यांना त्या जादुई दुनियेची ओढ निर्माण झाली. पण त्यांना एक अनामिक भीती मनात होती. अगदी मेडिकलला जाईपर्यंत त्यांच्या मनात ती भीती कायम होती. पण त्यादरम्यान त्यांनी हॉलिवूड चित्रपट पाहायला सुरुवात केली. बाथरुममध्ये जाऊन ते अॅक्टींग करत असत. मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर ते स्वतः ड्रामा सेक्रेटरी झाले आणि त्यांनी महाविद्यालयात त्यांनी खूप नाटकांत काम केली. पहिले वर्ष त्यांनी नाटकात काम करताना त्यांची भीती दूर केली. त्यानंतर त्यांनी पुढच्या पाच वर्षी पाच मोठी नाटके केली आणि 15-20 एकांकीका केल्या. वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यासापेक्षा त्यांनी नाटकेच जास्त गाजवली. 

 

शिक्षणाचा मार्गच चुकला...
लहान मुलांना त्यांना मनापासून काय करायच आहे यासाठी वेळ देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. लहानपणी लागू यांना ड्राईंग, गाणे, वाचन, स्विमींग, खेळ या सर्वांचा खूप शौक होता. पण मनापासून काय करायचे याचा शोध मेडीकल कॉलेजमध्ये लागला असे त्यांनी सांगितले. 

 

आफ्रिकेतून परतल्यानंतर ठरवले अभिनयात करीअर करायचे..
जानेवारी ते एप्रिलमध्ये त्यांना काम मिळाले नाही. पण इथे ओशाळला मृत्यू यापासून त्यांचे सात ते आठ नाटक साफ आपटले. तरीही त्यांना काम मिळत राहिले आणि नंतर ते नटसम्राट म्हणून ओळखले जाऊ लागले. 

 

पहिलाच चित्रपट होता 'पिंजरा'..
श्रीराम लागू यांचा पिंजरा हा चित्रपट तुफान गाजला. विशेष म्हणजे त्यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट केले. पण इतके काम केल्यानंतरही समाधान मिळते ते केवळ मराठी नाटकांतून असेही श्रीराम लागू यांनी सांगितले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, डॉ. श्रीराम लागू यांचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...