आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drought Film Mungala Makers Music Launch Party MNS Boycotts Event

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळावरच्या 'मुंगळा' चित्रपटाची झाली जंगी पार्टी, MNSने टाकला Event वर बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरव भानुशाली निर्मित आणि विजय देवकर दिग्दर्शित ‘मुंगळा’ ह्या चित्रपटाच्या फिल्ममेकर्सनी नुकतीच एक पार्टी मुंबईत केली. ज्यात त्यांनी आपल्या चित्रपटाचे म्युझिक लाँचही केले. ‘मुंगळा’ हा चित्रपट पाण्याच्या दुर्भिक्षावर भाष्य करणारा आहे. चित्रपटात शेतक-यांच्या व्यथांची कड घेणा-या फिल्ममेकर्सनी, सध्या शेतकरी खरोखरीच दुष्काळाचे दाहक चटके भोगत असताना, मुंबईत जंगी पार्टी करावी, ह्याचे आश्चर्यच वाटले.
विशेष म्हणजे, मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर ह्यांनाही ह्या पार्टीचे निमंत्रण होते, पण त्यांनी अशा कार्यक्रमापासून दूर राहणेच पसंत केले. अमेय म्हणतात, “मी फिल्ममेकर्सना सांगितले होते, की दुष्काळावरच्या चित्रपटाचे संगीत अनावरण साधेपध्दतीने होऊ द्या. आणि पण ते सेलिब्रेशनच्या मुडमध्ये दिसल्यावर मी ह्या आयोजनापासून दूर राहणेच पसंत केले. म्युझिक लाँचवेळी निमंत्रितांसाठी जेवण ठेवणे वगैरे ठिक आहे. आगत्य आपल्या संस्कृतीत आहे. पण केक कापून सेलिब्रेशन करायला नको होते.”
पण फिल्ममेकर विजय देवकर ह्यांचे म्हणणे आहे, की,“ आम्ही संगीत अनावरण सोहळा मराठवाड्यात करणार होतो. पण ते काही जमले नाही. म्हणून मुंबईत केला. आता आम्ही ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत, तेव्हा तिथली परिस्थिती पाहून अनुरूप मदत तिथल्या शेतक-यांना लगेच करण्याचा आमचा विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यात एखाद्या तरी गावाला एक बोरवेल बांधून देण्याचा माझा विचार आहे. पण ह्या संदर्भातला अभ्यास आमचा व्हायचा आहे. व्यवस्थित रिसर्च करून मगच निर्णय घेण्याचं आम्ही ठरवले आहे.”
चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक विजय देवकर ह्यांनी सांगतिलं,”मी सांगलीच्या दुष्काळी भागात लहानाचा मोठा झालोय, तिथे आजही माझी शेती आहे. मी एका हिंदी सिनेमाच्या लोकेशनसाठी जत तालुक्यात गेलो, तेव्हा तिथलं भयाण वास्तव पाहून मन विषण्ण झालं आणि ह्या मुंगळा चित्रपटाची कथा सुचली.”
मुंगळा हे चित्रपटाला नाव का ठेवलं, ह्याविषयी ते सांगतात, “ मुंगळे हे नेहमी पाण्याच्या जागीच सापडतात. आणि आम्ही शेतक-यांना ह्या चित्रपटातून ‘तुम्हीही मुंगळ्यांसारखे व्हा, पाणी शोधून त्याच्या सिंचनाचा विचार करा म्हणजे दुर्भिक्ष कधीच जाणवणार नाही’ असा संदेश देत आहोत.”
आता बीडच्या शेतक-यांना खरोखरीच मुंगळाचे फिल्ममेकर्स मदतीचा हात देतायत, की हे फक्त प्रमोशनसाठीचा स्टंट आहे, ते पुढील काळात कळेलच
(फोटो- प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसा दाखवलाय, फिल्ममेकर्सनी मराठवाड्यातला दुष्काळ