आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xclusive: मानसी नाईकने बनवला इकोफ्रेंडली बाप्पा, divyamarathi.com च्या आवाहनाला साद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसी नाईकने बनवली गणेशमूर्ती
ग्लोबल वॉर्मिंगची ओरड सातत्याने सर्व स्तरांतून होतेय. त्याचमूळे शेतक-यांनाही डोळ्यांत पाणी आणून आभाळाकडे पाऊस पडण्याची वाट पाहावी लागतेय. आणि सरकारला कृत्रिम पावसाचा आधार घ्यावा लागतोय. निसर्गाचा तोल बिघडवण्यात आपण प्रत्येकजण जबाबदार आहोत. आणि म्हणूनच दिव्यमराठीने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीं ऐवजी यंदा शाडू मातीच्या गणपती मूर्तींनाच प्राधान्य देण्याचे आवाहन केलंय. आणि या आवाहनाला काही सेलिब्रिटीजनी आपणहून साद घातलीय.
आजपासून दर मंगळवारी आम्ही आपल्याला अशा सेलिब्रिंटींना भेटवणार आहोत. जे divyamarathi.com सोबत शाडू मातीच्या गणपती मूर्ती स्वत: बनवणार आहेत. आणि आपल्या लाडक्या बाप्पाची शाडूचीच मूर्ती आपल्या घरी घेऊन जाणार आहेत. आजच्या मंगळवारी आम्ही तुम्हांला दाखवतोय, मुळची पूणेकर आणि आता मुंबईकर झालेल्या अभिनेत्री मानसी नाईकने केलेली शाडू मातीची मूर्ती.
मानसीने ही मूर्ती फक्त अर्धा तासात बनवली, खरं तर ती शाडूच्या मातीची मूर्ती पहिल्यांदाच बनवत होती. आपल्या अनुभवाबद्दल मानसी सांगते, “माझी मावशी जेजे स्कुल ऑफ आर्टमधनं कला शिकल्याने असावे कदाचित, कला माझ्या रक्तातच आहे. मावशीकडून मी पॉट्री(मातीची सुबक भांडी) बनवायला आणि पेटिंग करायला शिकलेलीच आहे. पण शाडूच्या मातीचा गणपती बनवण्याचा अनुभव काही आगळाच आहे. माझी ही इच्छा आज divyamarathi.com मूळे पूर्ण झाली."
मानसीची 'ढोलकी' फिल्म लवकरच रिलीज होणार आहे. शिवाय ती 'ढोलकीच्या तालावर' हा कार्यक्रम करतेय, त्यामूळे आपला गणपती सूध्दा हातात ढोलकी घेऊन असावा, असं सुरूवातीला मानसीला वाटतं होतं. पण पहिल्यांदाच शाडू मातीचा गणपती बनवत असलेल्या मानसीला ढोलकीचा आकार देणं अवघड असल्याचे लक्षात येताच, तिने तो नाद सोडला. आणि मांडी ठोकून बसलेला, मोठे कान असलेला, बाप्पा बनवला.
(सर्व फोटो- प्रदिप चव्हाण)
पूढील स्लाइडमध्ये वाचा, मानसी नाईक सांगतेय, आपल्या लाडक्या बाप्पाबद्दल