बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कतरिना कैफ, करिश्मा कपूरसह अनेक नावाजलेल्या अभिनेत्री शिक्षणात मागे आहेत. कतरिनाने तर कधी शाळेचे तोंडच पाहिले नाही तर करिश्मा केवळ पाचवीपर्यंत शिकली आहे. मात्र मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास येथील अनेक अभिनेत्री उच्चशिक्षित आहेत.
सई ताम्हणकर, स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी, सुरुची अडारकर, दीप्ती श्रीकांत, मृणाल दुसानिस, अमृता खानविलकर यांसह अनेक जणी ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहे. या सर्व अभिनेत्रींनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी आपल्या आवडत्या विषयात शिक्षण पूर्ण केले आणि नंतर आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठीतील या लिडिंग अॅक्ट्रेसेस किती शिकल्या आहेत, हे सांगत आहोत.
(नोटः इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर या अभिनेत्री किती शिकल्या आहेत, हे येथे नमुद करण्यात आले आहे.)