आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elizabeth Ekadashi Is A Marathi Movie By Paresh Mokashi

'एलिझाबेथ एकादशी' म्हणजे नेमके काय?, जाणून घ्या नावातच वेगळेपण असलेल्या या सिनेमाविषयी..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('एलिझाबेथ एकादशी' या सिनेमातील एक छायाचित्र)

“शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी”... असा संत विचारांचा अनमोल ठेवा आपल्याला वारसाहक्काने मिळाला आहे. “जे पेराल तेच उगवेल” अशी शिकवण आपल्याला कायम आजी आजोबांच्या गोष्टींमधून आणि शाळांच्या संस्कारवर्गांमधूनही दिली जाते. याच विचारांसारखा विज्ञानाचा पण एक नियम आहे तो म्हणजे “जशी क्रिया तशी प्रतिक्रिया”.. संतवाणीची ही शिकवण आणि विज्ञानाचा दृष्टिकोन घेऊन पंढरपूरचा एक चिमुरडा न्यूटन म्हणजेच ज्ञानेश प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पंढरीच्या विठू माऊलीवर त्याचा जेवढा जीव आहे तेवढंच प्रेम त्याच्या एलिझाबेथवरही आहे.
आता ही एलिझाबेथ कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? ही एलिझाबेथ म्हणजे त्यांच्या वडिलांनी तयार केलेली अनोखी सायकल. आपल्या वडिलांची आठवण असलेली ही सायकल ज्ञानेश आणि त्याची बहिण झेंडूचा जीव की प्राण. या एलिझाबेथला वाचवण्यासाठी ही भावंडं आपल्या सहका-याच्या मदतीने एकादशीच्या उत्सवात एक खेळ मांडतात त्याचीच कथा म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’ हा सिनेमा होय.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या सिनेमाविषयी बरेच काही...