आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elizabeth Ekadashi Marathi Movie Onlocation Pics

अशी रंगली पंढरीत \'एलिझाबेथ एकादशी\', पाहा On Locationची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नावातच वेगळेपणा असणा-या ‘एलिझाबेथ एकादशी’ या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 'एलिझाबेथ एकादशी' म्हणजे नेमके काय? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. 'एलिझाबेथ एकादशी'मधून पंढरपूरचा एक चिमुरडा न्यूटन म्हणजेच ज्ञानेश प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पंढरीच्या विठू माऊलीवर त्याचा जेवढा जीव आहे तेवढंच प्रेम त्याच्या एलिझाबेथवरही आहे. ही एलिझाबेथ आहे त्याच्या वडिलांनी तयार केलेली अनोखी सायकल. आपल्या वडिलांची आठवण असलेली ही सायकल ज्ञानेश आणि त्याची बहिण झेंडूचा जीव की प्राण. या एलिझाबेथला वाचवण्यासाठी ही भावंडं आपल्या सहका-याच्या मदतीने एकादशीच्या उत्सवात एक खेळ मांडतात त्याचीच कथा म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी’ हा सिनेमा आहे.
परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाची पूर्ण कथा पंढरपूरमध्ये आणि आषाढी एकादशीच्या वातावरणात घडते. छायालेखक अमोल गोळे यांनी सिनेमातील सर्व गोष्टी आपल्या कॅमे-यात टिपल्या आहेत. परेश मोकाशी यांच्या पत्नी मधुगंधा कुलकर्णी यांची ही कथा आहे.
यामध्ये ज्ञानेशची भूमिका श्रीरंग महाजनने केलीय, तर मुक्ता साकारलीय सायली भंडारकवठेकर हिने आणि त्यांच्या आईच्या भूमिकेत नंदिता धुरी आणि आजीच्या भूमिकेत वनमाला किणीकर आहेत. याशिवाय पुष्कर लोणारकर, चैतन्य बडवे, दुर्गेश बडवे महाजन, चैतन्य कुलकर्णी, अश्विनी भालेकर, अनिल कांबळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. बालदिनी म्हणजे येत्या 14 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'एलिझाबेथ एकादशी' या सिनेमाची ऑन लोकेशन शूटची काही निवडक छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंगवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...
(फोटो साभारः 'एलिझाबेथ एकादशी'चे फेसबुक पेज)