आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Elizabeth, Rege And Dr Prakash Baba Amte Films Awarded By Salam Pune Award

रेगे, डॉ प्रकाश बाबा आमटे, एलिझाबेथचा सलाम पुणे पुरस्काराने गौरव, पत्रकारांनाही केले सन्मानित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- 'खेड्यातीव 56 लाख कुटुंबात, तर शहरांतील 1 कोटी कुटंबात अजूनही स्वच्छतागृहे नाहीत. पुढील चार वर्षांत ही स्वच्छतागृहे बांधून दिलसी जातील, त्यासाठी लाभार्थींना हजार रुपयांऐवजी यापुढे 12 हजार रुपये दिले जातील.' असे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी (4 जानेवारी) सलाम पुणेच्या वतीने आयोजित मराठी पत्रकार दिन सोहळ्यात सांगितले. ते या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट पत्रकरिता पुणे पुरस्कार संभाजी पाटील , अरुणा अंतरकर, हरीश केंची, नरेंद्र शिंदे, अजित चव्हाण यांना लोणीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 'मामाच्या गावाला जावू या' या सिनेमातील अभिनयाबद्दल उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेचा सलाम पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच, 'डॉ. प्रकाश बाबा आमटे', 'एलिझाबेथ एकादशी' आणि 'रेगे' या सिनेमांना सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी सलाम पुणे पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. एलिझाबेथ सिनेमातील सर्व कलावंत यावेळी उपस्थित होते. दिग्दर्शक अभिजित पानसे, समृध्दी पोरे, मधुगंधा कुलकर्णी, अश्विनी दरेकर यांनी ह पुरस्कार स्वीकारला.
तसेच, उत्कृष्ट माध्यम जनसंपर्क पुरस्कार वर्षा मराठे आणि सामाजिक कार्याबद्दल 'आनंदवन व्यसनमुक्ती'चे डॉ. अजय दुधाणे यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री आशा काळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर,सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर कार्याध्यक्ष संतोष चोरडिया , जगदीश नागरे दिग्दर्शक शिव कदम , दीपक सवाखंडे प्रसाद सुर्वे ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर निर्माते निखिल बोत्रे , सुवदन आंग्रे . एकनाथ जावीर एम के धुमाळ , विजयराज चौधरी अभिनेता वैभव पगारे ,निखिल वैरागर सचिन गवळी , मयुर लोणकर , अभिनेत्री मिथीला नाईक, उषा शेट्टी उपस्थित होते.
यावेळी लोणीकर म्हणाले, पुण्यातील सलाम पुणे या संस्थेचे नाव मुंबईत ही संस्था सर्वत्र परिचित आहे. या संस्थेचा पुरस्कार मिळणे म्हणजे प्रतिष्ठेचे मानजा जाते. मी स्वत: 4 वर्षांत चांगले कार्य करणार आहे, तेव्हा निश्चित माझासुध्दा या पुरस्काराने गौरव करावा. चांगल्या-वाईट गोष्टींचे खरे चित्र समाजासमोर आणून लोकांना जागे करण्याची, योग्य दिशा दाखवण्याची जबाबदारी लेखक, कलावंत आणि पत्रकारांची आहे. ही जबाबदारी योग्यरित्या पेलली जात आहे, याचे समाधान आहे.
या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित अरुण अंतरकर यांनी सिनेमांना पुरस्कार वारंवार मिळतात, त्यांचे कौतुकही भरपूर होते. परंतु सिनेपत्रकार हा घटक कायमच दुर्लक्षित राहिला. सलाम पुणेने मात्र सिनेपत्रकारांचा गौरव करण्याची प्रथा सुरु ठेवली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सलाम पुणे' या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असलेल्या कलावंत, पाहूणे आणि इतर मंडळींची छायाचित्रे...