आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engagement:स्वानंदी-नील आणि संपदा-महेशचा झाला साखरपुडा, ललिताची मात्र झाली फजिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वानंदी आणि नील ह्यांच्यासोबत महेश आणि संपदाचाही साखरपुडा करण्याचं देशपांडेंनी ठरवलं. त्यामुळे एकाचवेळी देशपांडेंच्या दोन्ही मुलींचा साखरपुडा होताना आता आपण पाहणार आहोत. पण मोठा बडेजाव मिरवतं, आपल्या मुलांचे वाढदिवस आपण फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये कसे साजरे करतो, आणि साखरपुडाही कसा थाटात होणार, हे जोशी कुटूंबाला सांगणा-या ललिताची मात्र चांगलीच फजिती होणार आहे. ललिताची फजिती व्हावी, ह्यासाठी दर दिवशीच प्रयत्न करणा-या वच्छीच्या हातात तर आयतंच कोलीत मिळालेलं आपण पाहणार आहोत.
वच्छी आत्या साकारणा-या वर्षा दांडले म्हणतात, “ललिताच्या डोक्यावर मिरे वाटणारी सून यावी, अशी वच्छीची खूप इच्छा होती. ती पूर्ण होताना वच्छीला दिसतेय. नीलचा आणि स्वानंदीचा साखरपुडा होतोय. ललिताला कोंडीत पकडण्याचा एकही चान्स वच्छी सोडत नाही. त्यामुळे साखरपुड्यादिवशीही ललिताची फजिती व्हावी, अशीच वच्छीची इच्छा आहे. जोशी कुटूंबीय जेव्हा ललिताकडे आले होते. तेव्हा आपल्या स्वभावाप्रमाणे ललिताने मोठ-मोठ्या बाता मारल्या होत्या. माझ्या मुलाचा साखरपुडा आमच्या मान-सन्मानाप्रमाणे फाइव्ह स्टारमध्येच होईल, असं ती बोलली होती. पण साखरपुडा मात्र अगदी छोट्या सभागृहात होतोय. अशा वेळेस नेमके जोशीच साखरपुड्याला आलेत. त्यामुळे ललिताचं पितळ उघडं पडतंय, आता तिची मस्त भंबेरी उडतेय. आणि मग ते पाहायला अर्थातच वच्छी आत्याला खूप मजा येणार आहे.”
ललिताची भूमिका करणा-या सुहास परांजपे म्हणतात, “ललिताला घराण्याबद्दलचा जरा जास्तच अभिमान आहे. तिला काहीही झालं तरी स्टेटसची पडलेली असते. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या साखरपुड्याविषयीही तिला खूप अपेक्षा आहेत. साखरपुडा हा थाटात व्हायला हवा, असं तिला वाटतंय. पण साखरपुडा साधेपणाने होतोय. अशावेळी ज्यांच्यासमोर घराणेशाहीच्या बाता मारल्या होत्या. तिचं लोकं साखरपुड्याला आलेली आहेत. त्यामुळे आता काय करू, कुठे लपू असं ललिताला झालंय. आणि मग ती वेळ मारून नेण्यासाठी ‘महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय ना, त्यामुळे माझ्या नीलला थाटात करायचा नाही साखरपुडा.’ अशी काहीही कारण देते.”
सुहास परांजपे पूढे सांगतात, “जोशीबाई महेशची मावशी आहे, हे ललिताला माहित नसल्याने ती आम्ही साखरपुडा फाइव्ह स्टारमध्ये आणि लग्न पॅलेसमध्ये करणारं, असं काहीबाही बोललेली असते. पण म्हणून जोशीसमोर आल्यावर गप्प बसेल, ती ललिता कसली. तिने जोशींना टोमणा मारयचा तो मारलाच आहे. तुमच्या भाच्यासारखा माझा मुलगा काही अमेरिकत जाणार नाही. समारंभनंतरही करता येतील, असे ती सुचक बोलून गेलीय. ”
पुढील स्लाइडमध्ये वाचा, संपदा का नाराज झाली साखरपुड्यात