आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-हसबंडने सांगितले, घोरता-घोरता झोपेतच झाला रिमा लागू यांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री रिमा लागू यांच्या मृत्यूविषयी त्यांचे पती विवेक लागू यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत, विवेक लागू यांनी रिमा यांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे सांगितले. सध्या छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या 'नामकरण' या मालिकेत त्या दयावंतीची निगेटिव्ह भूमिका साकारत होत्या. 18 मे (गुरुवारी) पहाटे 3.20 वाजता त्यांचे निधन झाले. 

काय सांगितले विवेक लागू यांनी...
- "रिमा यांना हृद्यविकाराचा यापूर्वी कधीही त्रास झाला नव्हता. हा खूप मोठा झटका होता. रिमा यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर मुलगी (मृण्मयी) आणि जावयाने (विनय वैकुल) त्यांना अंधेरीस्थित कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले."
- "रात्री एक वाजेच्या सुमारास रिमा यांना त्रास जाणवत होता. तब्येत ठिक नसल्याने डॉक्टरांकडे जायला उशीर नको, असे दोघांना वाटले. रिमा यांना अॅसिडीटीचा त्रास होत असावा, असे मृण्मयी आणि विनय यांना वाटले होते."
- "रुग्णालयात दाखल केल्यानंतर रिमा यांची ईसीजी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना माइल्ड अटॅक आल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते."

झोपी गेल्या त्या कायमच्याच....
- विवेक यांनी पुढे सांगितले, "मृण्मयी आणि विनय यांनी आमच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती दिली. दरम्यान रिमा यांना झोप लागली आणि त्या घोरायला लागल्या."
- "पण झोपेतच त्यांचे पल्स रेट आणि ब्लड प्रेशर बिघडले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना रिमा यांना वाचवण्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी पहाटेचे 3.20 वाजले होते."
- विवेक यांनी सांगितले, की ते त्यावेळी हॉस्पिटलमध्ये उपस्थित नवह्ते. रिमा यांच्या निधनाची बातमी मुलगी मृण्मयी आणि जावई विनय यांच्याकडून त्यांना कळली. 

बँकेत एकत्र काम करताना रिमा यांच्या प्रेमात पडले होते विवेक...
- विवेक यांनी सांगितले, की ते आणि रिमा एकाच बँकेत काम करते होते. त्याचकाळात ते रिमा यांच्या प्रेमात पडले होते. यामागचे एक मोठे कारण म्हणजे दोघांनाही रंगभूमीविषयीची आवड होती.
- विवेक यांनी मुलाखतीत पुढे सांगितले, की नोव्हेंबर 1976 मध्ये त्यांची रिमा यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी रिमा 23 वर्षांच्या होत्या. 1978 साली दोघांनी लग्न केले होते. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, सामंजस्याने विभक्त झाले होते रिमा-विवेक..
बातम्या आणखी आहेत...