आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : भेटा मराठी इंडस्ट्रीतील नवीन आयटम गर्ल हृषिता भटला, शूट केले आयटम साँग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयटम साँगचे शूटिंग करताना अभिनेत्री हृषिता भट)
मुंबई : बॉलिवूडमध्ये आयटम साँग करायला लिडींग अभिनेत्रींना आवडतं. काहींची संपणारी करिअर आयटम साँगने वाचवली आहेत आणि आता बॉलिवूड अभिनेत्री हृषिता भटही आयटम साँग करायला सध्या खूप उत्सुक आहे.
‘१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी’ या चित्रपटात ती एक आयटम साँग करताना दिसणार आहे. ‘मख्खन मलाई में ब्रेड बटर हो...’ असे गाण्याचे बोल आहेत. हृषिता सांगते, ''मी मुळातच डान्सर असल्याने आयटम साँग करायला मला खूप आवडतं आणि या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी चित्रपटातलं गाणं असले तरीही ते पूर्णपणे हिंदीमध्ये आहे. त्यामुळे माझ्यासाठी खुपच सोप्प होतं. गणेश आचार्याची कोरिओग्राफी आहे, म्हटल्यावर तर गाण्याला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. आधी गाणं दोन दिवसांमध्ये चित्रीत करण्याचं ठरलं होतं. पण आम्ही एका दिवसातच गाणं पूर्ण करू शकलो.”
Divyamarathi.com ला या नकत्याच चित्रीत झालेल्या आयटम साँगचे एक्सक्लुझिव्ह फोटोही मिळाले आहेत. या आयटम साँगमध्ये चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले ओम पूरीसुध्दा आपल्याला हृषितासोबत डान्स करताना दिसणार आहेत. हृषिता म्हणते, ''ओम पूरींसोबत मी या अगोदरही काम केलंय. त्यात या चित्रपटाचे दिग्दर्शक राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आहेत, म्हटल्यावर चित्रपट चांगला असणारचं. एकूणच या सगळ्या गोष्टींमुळे मी चित्रपटात आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला.”
२०१० मध्ये ‘मणी मंगळसुत्र’ सिनेमामध्ये हृषिता दिसली होती. त्यानंतर नुकताच तिने ‘ढोलताशे’ हा चित्रपटही केलाय. या दोन्ही चित्रपटात तिला मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता साऊथ फिल्म इंडस्ट्रीनंतर मराठीमध्ये पूर्णवेळ करिअर करायची इच्छा आहे का असं विचारल्यावर ती म्हणते, “मी आजपर्यंत पूर्ण वेळ कोणत्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहायचं वगैरे असा विचार केलाच नाही. हिंदी, तमिळ, तेलगु, कन्नडा ज्या ज्या फिल्मच्या ऑफर आल्या. मी नेहमीच स्विकारल्या. मला असं वाटतं, फिल्मचा विषय आणि कामाचं स्वरूप जास्त महत्वाचं असतं. भाषा नाही. मला जेव्हा ‘मणी मंगळसुत्र’ फिल्म मिळाली होती. तेव्हा तर कोणतीही हिंदी अभिनेत्री मराठी फिल्म करण्याचा गांभिर्याने विचारही करत नव्हती. आता तर मराठी फिल्ममध्ये एवढे निरनिराळे प्रयोग होऊ लागलेत. आता '१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी' फिल्मचंच उदाहरण घ्या ना, मराठी फिल्मला हिंदी भाषेतलं आयटम साँग आहे. पूर्वी एवढ्या बारकाईने कुठे विचार व्हायचा. पण आता होतोय ना. माझी ‘ढोलताशे’ फिल्म सुध्दा अशीच वेगळी आहे.”
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हृषिता भटवर चित्रीत झालेल्या गाण्याची ऑन लोकेशन झलक...