आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exclusive : First Look Of Marathi Drama Talyat Malyat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE : पाहा \'तळ्यात-मळ्यात\' नाटकाचा FIRST LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगभूमीवर शिवदर्शन साबळे, वैजयंती साबळे आणि संतोष काणेकर निर्मित आणि अभिजीत गुरू लिखीत-दिग्दर्शित दोन अंकी सस्पेन्स-थ्रिलर नाटक ‘तळ्यात-मळ्यात’ येतंय. ज्याचा फस्ट लूक फक्त divyamarathi.com ला रिव्हील झाला आहे.
अभिजीत गुरूने एका स्पर्धेसाठी दिर्घांक लिहीला होता. जो शिवदर्शन साबळेने पाहिला आणि हे नाटक प्रेक्षकांपर्यंत आणण्याचा चंग बांधला. शाहिर साबळेंच्या या नातवाने नाटकाची निर्मिती करण्यासोबतच नाटकाला संगीत सुध्दा दिलंय. शिवदर्शन साबळे याबद्दल सांगतात,“हे एक नवीन पिढीचं नाटक आहे, असं मला वाटलं. ते रंगभूमीवर यावं यासाठी मी झपाटून गेलो. गेल्या पाच वर्षांत असं सस्पेन्स थ्रिलर नाटक रंगभूमीवर आलंच नसेल. त्यामुळेच ते आणण्यासाठीचा हा खटाटोप. याचं संगीत देताना, नाटकातला माहोल मनांत भरून राहावा याच उद्देशाने बॅरग्राउंड म्युझिक मी दिलंय.”
चरितार्थ चालवण्या इतपतही व्यवस्थित न कमावणारा लेखक नवरा अश्विन आणि त्याची नोकरी करणारी होममेकर बायको निलीमा यांच्या नातेसंबधातून नाटक आपल्यासमोर उलगडत जातं. महानगरात राहताना, आपापल्या पध्दतीने यश आणि पैसा कमावू इच्छिणारं हे जोडपं, एकमेकांवर प्रेम करत असूनही आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी एकमेकांपासून लपवतं आणि एकमेकांपासून या गोष्टी लपवतानाची त्यांची ‘तळ्यात-मळ्यात’ अवस्था या नाटकात दिसून येते. आणि जसं नाटक उलगडतं जातं, तसे प्रत्येक व्यक्तिरेखेचे कंगोरेही समोर येऊ लागतात. अभिजीत गुरू, समिधा गुरू, अमृता संत, राजु बावडेकर, चिन्मय पाटसकर यांच्या या नाटकामध्ये मुख्य भूमिका आहेत.
आपल्या भूमिकेविषयी सांगताना अमृता सांगते, ”समिधा आणि माझ्या मुळ स्वभावाच्या परस्पर विरोधी भूमिका आम्ही साकारत असल्याने, नाटक करताना आम्ही एकमेकींची मदत घेतोय. मध्यमवर्गीय आणि सरळमार्गी गृहिणी स्वभावाची निलीमा खरं तर समिधा सारखी आहे. पण ती मला साकारयचीय म्हटल्यावर ब-याचवेळी मी समिधाचं अनुकरण करते. तर समिधा स्विटी ही भूमिका करतेय. जी एक कॉर्पोरेट माइंडची अपॉर्च्युनिस्ट स्त्री आहे. त्यासाठी तशी देहबोली समिधाला अनुसरावी लागली आहे.”
चिन्मय पाटसकर यात चार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. तो सांगतो, ” खरं तर अभिजीतने लिहीलेल्या दिर्घांकात माझं पात्रच नव्हतं. माझी भूमिका आत्ता नाटकात आली. आणि माझ्या भूमिकेमुळेच नाटकातला सस्पेन्स उलगडत जातो. आणि नाटकातलं नाटक माझ्या अवतीभवती फिरतं. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी जेवढं इंटरेस्टिंग आहे. तेवढाच हा नाट्यानुभव प्रेक्षकांसाठीही असणार आहे.”
6 जूनपासून रंगभूमीवर 'तळ्यात मळ्यात' हे सस्पेन्स थ्रिलर नाटक येत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अभिजीत गुरू, समिधा गुरू, अमृता संत, राजु बावडेकर, चिन्मय पाटसकर या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'तळ्यात मळ्यात' नाटकाची खास झलक छायाचित्रांमधून...