आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान दादांच्या रुपात या अभिनेत्याला ओळखू शकली नव्हती विद्या, वाचा Unknown Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे पहिले अॅक्शन स्टार भगवान आबाजी पालव अर्थातच भगवान दादा यांनी केलेल्या भरीव कामगिरीसाठी सिनेसृष्टीत कायम त्यांची ऋणी राहणार आहे. भगवान दादा केवळ अॅक्शनसाठीच नव्हे तर त्यांच्या डान्सिंग स्टाईलसाठी ओळखले जायचे. अनेक अभिनेते त्यांची डान्सिंग स्टाईल कॉपी करायचे, किंबहुना आजही करत आहेत. शोला जो भडके आणि भोली सुरत या गाण्यांवर प्रेक्षक आजही ताल धरतात.

भगवान दादांच्या जयंतीनिमित्त अभिनेता मंगेश देसाईंनी खास गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या आहेत. अलीकडेच रिलीज झालेल्या 'एक अलबेला' या सिनेमात मंगेश देसाईंनी भगवान दादांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारली होती. भगवान दादांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'एक अलबेला' या सिनेमात काम करण्याचा अनुभव आणि यानिमित्ताने त्यांच्याविषयी जाणून घेतलेल्या अनेक गोष्टी त्यांनी शेअर केल्या आहेत.
'एक अलबेला' या सिनेमात भगवान दादांची भूमिका ऑफर झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती?
- महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा मी सिनेमाची स्क्रिप्ट ऐकली, तेव्हा भगवान दादांची भूमिका मला करण्याची संधी मिळतेय, यावर माझा विश्वासच बसला नाही. कारण आमच्या दोघांमध्ये काहीच साम्य मला आढळले नाही. मात्र दिग्दर्शक शेखर यांनी त्यांच्या लॅपटॉपमध्ये भगवान दादांचे काही फोटोज दाखवले आणि आमच्या दोघांमध्ये बरेच साम्य असल्याचे सांगितले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, आणखी काय सांगितले मराठमोळ्या मंगेश देसाईंनी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...