आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

EXCLUSIVE : रंगभूमीवर उलगडणार इंदिरा गांधीजींच्या आयुष्यातली शेवटच्या नऊ वर्षांचा प्रवास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('इंदिरा' या नाटकातील दृश्ये...)

मुंबईः सुप्रसिध्द नाटककार रत्नाकर मतकरी आपलं महत्वाकांक्षी नाटक ‘इंदिरा’ येत्या 28 मे पासून रंगभूमीवर घेऊन येतायत. इंदिरा गांधी यांच्या शेवटच्या 9 वर्षांच्या राजकिय आणि वैयक्तिक जीवनावर या नाटकाद्वारे प्रकाश टाकण्यात आलाय. गांधी कुटूंबातील इंदिरा, राजीव आणि संजय या प्रमुख भूमिकांचा या नाटकात समावेश असणारेय.
नाटकात इंदिरा गांधींची भूमिका अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी वठवली आहे. तर राजीव गांधींच्या भूमिकेत अभिनेता नकुल घाणेकर झळकणार आहे. इंदिरा गांधी यांचा धाकटा मुलगा संजय गांधींच्या भूमिकेत अभिनेता विक्रम गायकवाड दिसणारेय.
या नाटकात इंदिराजींच्या आयुष्यातली शेवटची नऊ वर्षं दाखवल्याने, त्याच्यातली आई, आजी, प्रगल्भ राजकारणी, त्यांची मुत्सद्देगिरी, असे अनेक कंगोरे सुप्रिया विनोद यांना दाखवायचे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बारकाईने अभ्यास करावा लागला असल्याचे सुप्रिया यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला या नाटकाची एक्सक्लुझिव्ह झलक खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...
सर्व छायाचित्रे : अजित रेडेकर