आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Exclusive Singer Mangesh Mangesh Borgaonkar Tie The Knot With Apurva Athavale

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Exclusive: गायक मंगेश बोरगांवकर अडकला लग्नाच्या बेडीत, गर्लफ्रेंडसोबत झाला विवाहबद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवविवाहित दाम्पत्य मंगेश बोरगांवकर आणि अपुर्वा आठवले)

मंगेश बोरगांवकर आपली गर्लफ्रेंड अपूर्वा आठवलेसोबत 4 मे रोजी जळगावमध्ये लग्नाच्या बेडीत अडकला. फक्त नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनाच मंगेशच्या लग्नाचं निमंत्रण गेलं होतं.
मंगेशची पत्नी अपूर्वा आठवले ही ऑडिओलोजिस्ट आणि स्पिच थेरपिस्ट आहे. ती मुळची रावेरची असल्याकारणाने लग्नही रावेरमध्येच झालं आणि त्यामुळे मंगेशच्या मुंबईतल्या आणि फिल्म इंडस्ट्रीमधल्या अनेक मित्र मैत्रिणींना लग्नाला जाता आलं नाही. फक्त त्याचा गीतकार मित्र निलेश मोहरीर आवर्जुन लग्नाला उपस्थित होता. याचवर्षी महिलादिनी मंगेशने आपलं आणि अपूर्वाचं रिलेशन सोशल नेटवर्किंग साइटवरून जाहिर केलं होतं.
मुळच्या लातुरच्या असलेल्या मंगेशने सारेगमप मधून ग्लॅमर क्षेत्रात प्रवेश घेतला. आणि सुरेल स्वरांमुळे त्याला अनेक मराठी फिल्ममध्ये गाण्याच्या ऑफर्सही मिळाल्या. मंगलाष्टक वन्स मोअर, सुराज्य, इश्कवाला लव्ह अशा चित्रपटांमधल्या गाण्यामधनं त्याचा चाहतावर्ग वाढतं गेला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मंगेश आणि अपुर्वाच्या लग्नाची खास छायाचित्रे...