आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is The Exclusive Wedding Pics Of Well Known Singer Adarsh Shinde

EXCLUSIVE : गायक आदर्श शिंदे गर्लफ्रेंडसोबत चढला बोहल्यावर, पाहा Wedding Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेचं त्याची गर्लफ्रेंड नेहा लेलेसोबत बुधवारी मुंबईत थाटात लग्न झालं. लग्नापूर्वीची आदर्शची हळदसुध्दा त्याच्या चित्रपट क्षेत्रातल्या मित्रांनी एन्जॉय केली. आपल्या लग्नाच्या हळदीत आदर्शने 'जीव रंगला...' हे गाण गायलं. आणि त्याचा जीव नेहात किती रंगलाय, हे दाखवलं.
लग्नही अगदी झोकात पार पडलं. लग्नाच्या वरातीचं वैशिष्ट्य म्हणजे नवरा-नवरी एकाच बग्गीत बसले होते. लग्न बौध्द पध्दतीने लागलं. लग्नात आदर्श-नेहाच्या या ‘प्यारवाल्या लव्हस्टोरी’ला शुभेच्छा द्यायला पोहोचल्या सेलिब्रिटीजमध्ये दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर ही 'दुनियादारी'ची टीम उपस्थित होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आदर्श-नेहाच्या लग्नाची एक्सक्लुझिव्ह छायाचित्रे...