आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actress Sai Lokur Share Screen With Kapil Sharma In Upcoming Hindi Film

मराठी इंडस्ट्रीतील ही ग्लॅमरस अॅक्ट्रेस करतेय कपिलसोबत रोमान्स, जाणून घ्या हिच्याबद्दल...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः सई लोकूर आणि कपिल शर्मा)
मराठी सिनेइंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सई लोकूर लवकरच मोठ्या पडद्यावर विनोदवीर कपिल शर्मासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांच्या आगामी 'किस-किस को प्यार करू' या सिनेमात सई कपिलसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
अलीकडेच या सिनेमाच्या शूटिंगची काही छायाचित्रे समोर आली होती. ही छायाचित्रे मंडोर आणि पंचकुंडाच्या छतरियामध्ये पार पडलेल्या शूटिंग सेटवरची होती. येथे सिनेमातील एक गाणे शूट करण्यात आले होते. उंटावर स्वार झालेली अभिनेत्री सई लोकुर गाणे गुणगुणताना दिसली. 'किस किस को प्यार करु' या सिनेमात सईसोबत एली अवराम आणि मंजिरी फडणीस या अभिनेत्रींच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
कपिल शर्मासोबत ऑन स्क्रिन रोमान्स करणा-या सईविषयी आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.

सई प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शिका वीणा लोकूर यांची लेक आहे. सईचा जन्म बेळगावात झाला. येथील'सनफ्लोवेर नर्सरी स्कूल'मध्ये तिने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 'डीवाइन प्रॉव्हिटन्स कोंवेट हायस्कूल'मध्ये हायस्कूलपर्यंत शिकली. पुढे तिने मुंबईतील रुपारेल कॉलेज आणि गोगटे कॉलेजमधून आपले बी. कॉम पूर्ण केले.
सईला बालपणापासूनच अभिनयाची फार आवड होती. बालपणी तिने बालकलाकार म्हणून अनेक नाटकांमधून अभिनय केला. सई एक उत्तम स्विमरदेखील आहे. सई मोठ्या पडद्यावर तिच्या आईने दिग्दर्शित केलेल्या 'प्लॅटफॉर्म' या सिनेमात झळकली.
सई लोकूरचे गाजलेले सिनेमेः
मी आणि यु (2013), जरब (2013), नो एन्ट्री पुढे धोका आहे (2012), पारंबी (2011), मिशन चॅम्पियन (2007) या मराठी सिनेमांसोबत सई काही हिंदी सिनेमांमध्ये झळकली आहे. कुछ तुम कहो कुछ हम कहे (2002) आणि पकडा गया (2011) हे तिचे हिंदी सिनेमे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कपिलसोबत ऑन स्क्रिन रोमान्स करणा-या मराठमोळ्या सईचा ग्लॅमरस अंदाज...