('बाजी' सिनेमाच्या पोस्टरवर अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी)
निखिल महाजन दिग्दर्शित आणि दार मोशन पिक्चर्स, अॅफलूएन्स मुव्हीज, ब्ल्यू ड्रॉप एन्टरटेन्मेंट आणि आयएमई मोशन पिक्चर्सची निर्मिती असलेला 'बाजी' हा सिनेमा आज मोठ्या पडद्यावर झळकतोय. त्यामुळे अभिनेता श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या कलाकारांची
बॉक्स ऑफिसवर आज 'बाजी' लागणार आहे. बाजी, चिद्विलास आणि मार्कंड या तीन व्यक्तिरेखांभोवती 'बाजी' या सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर सुपरहीरोच्या भूमिकेत अवतरणार आहे, तर जितेंद्र जोशीने सिनेमात मार्कंड नावाच्या व्हिलनची भूमिका वठवली आहे. अमृता खानविलकर गौरी नावाच्या गावातील तरुणीच्या भूमिकेत आहे. एका छोट्याशा गावात राहणा-या चिद्विलास नावाच्या तरुणाचे गौरी नावाच्या मुलीवर प्रेम आहे, तर गौरीचे प्रेम बाजीवर आहे आणि बाजीचे प्रेम गावावर, अशी ही कथा आहे. एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे प्रत्येक जण त्यात कसा गुंफला जातो. पुढे त्यांच्यासोबत काय घडतं, हे या सिनेमाच चित्रीत करण्यात आले आहे.
रिलीजपूर्वीच या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा सिनेमा का बघावा, या सिनेमाची काय वैशिष्ट्ये आहेत, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत...