आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅप्पी बर्थडे! स्वप्नीलने वकिलीकडे फिरवली पाठ, आठव्या वर्गात पहिल्यांदा पडला होता प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील आजचा आघाडीचा अभिनेता कोण, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘स्वप्नील जोशी’. स्वप्नीलची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा लोकांनी इतकी उचलून धरली आहे की रोमँटिक हीरो म्हणून स्वप्नील हा प्रेक्षकांचा आणि दिग्दर्शकांचा आवडता आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत.
अलीकडच्या काळात रिलीज झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’ या सिनेमांमुळे स्वप्नील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र ही लोकप्रियता स्वप्नीलला आता मिळतेय असे नाहीये. या यशाची चव स्वप्नीलने अगदी बालपणीच चाखली आहे. छोट्या पडद्यावर 'कुश' आणि 'श्रीकृष्णा'च्या रुपात त्याचे प्रेक्षकांना दर्शन घडले. 'कुश' ही त्याने साकारलेली पहिलीच भूमिका होती. मात्र श्रीकृष्णाच्या भूमिकेतून तो यशोशिखरावर पोहोचला.
आज स्वप्नीलच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तु्म्हाला स्वप्नीलला श्रीकृष्णाची भूमिका कशी मिळाली, तो किती शिकला आहे, त्याचे आईवडील काय करतात, याविषयी सांगत आहोत... चला तर मग जाणून घेऊयात, महाराष्ट्राच्या लाडक्या स्वप्नीलविषयी सर्व काही...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...