आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2nd Marriage : आता दुसरा संसार थाटणार शशांक, हे 6 फेमस मराठी सेलेब्स चढले दुस-यांदा बोहल्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड इंडस्ट्रीत एकापेक्षा अधिक वेळा लग्न केल्याची अनेक उदाहरणे बघता येतील. सैफ अली खान, आमिर खान, संजय दत्त यांसारख्या नावाजलेल्या सेलिब्रिटींनी एकापेक्षा अधिक वेळा लग्न थाटले. बॉलिवूडप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीतसुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत. मराठातील काही नावाजलेल्या सेलिब्रिटींचे पहिले लग्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी दुसरा जोडीदार शोधला आणि पुन्हा एकदा नव्याने वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली.
 
शशांक केतकर 
भावी पत्नी - प्रियांका ढवळे 
आता हेच बघा ना, 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला श्री अर्थात अभिनेता शशांक केतकरसुद्धा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शशांक दुस-यांदा लग्न थाटतोय. प्रियांका ढवळे हे शशांकच्या भावी पत्नीचे नाव आहे. शशांकचे पहिले लग्न अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत झाले होते. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेच्या सेटवर दोघांचे प्रेम फुलले आणि मालिका संपता-संपता दोघांचे नातेही संपुष्टात आले. तेजश्रीपासून विभक्त झाल्यानंतर शशांकच्या आयुष्यात प्रियांकाच्या रुपाने पुन्हा प्रेमाची नवी पालवी फुटली. काही महिन्यांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला असून लवकरच दोघे लग्न थाटणार आहेत. 
 
या पॅकेजमधून अशाच आणखी काही सेलिब्रिटींविषयी जाणून घेऊयात, ज्यांनी पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर दुसरा संसार थाटला. पाहूया कोण आहेत ती सेलिब्रिटी मंडळी...
बातम्या आणखी आहेत...