आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठारेंच्या सूनबाईंसह या मराठी सेलेब्सना नाहीत सख्खे बहीणभाऊ, आहेत एकुलती एक मुले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उर्मिला कानिटकर-कोठारे, सखी गोखले - Divya Marathi
उर्मिला कानिटकर-कोठारे, सखी गोखले
मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते महेश कोठारेंची सूनबाई आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिचा आज वाढदिवस आहे. 4 मे  1986 रोजी पुण्यात जन्मलेल्या उर्मिलाने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. 'शुभमंगल सावधान' या सिनेमातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, तर 'तुझ्याविना' ही तिची पहिली टीव्ही मालिका आहे. ती एक ट्रेंड कथ्थक डान्सर असून यामध्ये तिने एम. ए केले आहे. 2013 मध्ये उर्मिलाने तेलगू सिनेमातही काम केले होते. सध्या उर्मिला छोट्या पडद्यावर 'सरगम' या सांगितिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून ‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'विठा' या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारेय. 

आईवडिलांची एकुलती एक लेक..
उर्मिला तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक आहे. उर्मिलाची आई निलिमा कानिटकर या प्रसिद्ध वकील असून सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर असतात. मराठी इंडस्ट्रीत उर्मिलासोबतच असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना सख्खे बहीणभाऊ नाहीत. हे सेलिब्रिटी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुले आहेत.
 
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मराठीतील कोणकोणते कलाकार हे एकुलते एक आहेत, त्याविषयी सांगत आहोत...  
 
बातम्या आणखी आहेत...