आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी अभिनेत्रींचा वेडिंग डे Look : लग्नाच्या दिवशी कुणाचे साडीत तर कुणाचे नववारीत खुलले रुप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः  लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस. आपल्या लग्नाच्या दिवशी आपण सुंदर, मोहक, आकर्षक आणि डौलदार दिसायला हवं असं प्रत्येकीलाचं वाटतं. ‘नवरी मुलगी काय सुंदर दिसते’ ही कोणत्याही नववधूला हवीहवीशी वाटणारी ‘कॉम्प्लिमेंट’!  मग ती तरुणी सामान्य असो वा सेलिब्रिटी, आयुष्यातील या खास क्षणांसाठी सर्वच जणी भरपूर तयारी करत असतात. स्वतःच्या लग्नाची अशीच तयारी केली होती.
 
अलीकडेच विवाहबद्ध झालेल्या अभिनेत्री ईशा फडके हिने. 'ती सध्या काय करते' या सिनेमातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करणारी ईशा याचवर्षी 28 फेब्रुवारी रोजी विवाहबद्ध झाली. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, श्रुती मराठे, मयुरी वाघ, पल्लवी पाटील या अभिनेत्रीसुद्धा अलीकडच्या काळातच लग्नाच्या बेडीत अडकल्या. या खास दिवसासाठी काहींनी साडीची तर काहींनी नऊवारीची निवड केली होती. नवरीच्या रुपात या सर्वच अभिनेत्रींचे सौंदर्य अधिकच खुलले होते. लग्नाच्या छायाचित्रांमधून त्यांचे सुंदर रुप त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळाले. 

केवळ याच अभिनेत्री नव्हे तर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, अपुर्वा नेमळेकर, प्रिया बापट, क्षिती जोगसह अनेकजणी लग्नाच्या दिवशी दृष्ट लागेल इतक्या सुंदर दिसल्या. 

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मराठी इंडस्ट्रीतील या नावाजलेल्या अभिनेत्रींचा लग्नाच्या दिवशी कशा नटल्या होत्या, याची झलक खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचा स्टनिंग वेडिंग डे लूक... 
बातम्या आणखी आहेत...