Home | Bollywood | Marathi Cinekatta | Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri

'फँड्री'मधील 'जब्या'च्या 'शालू'चा येतोय नवा सिनेमा, जाणून घ्या मधल्या काळात कुठे होती

वैशाली करोले | Update - Jul 07, 2016, 01:59 PM IST

दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'फँड्री' या सिनेमात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांच्यासह आणखी एका नवोदित चेह-याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आम्ही बोलतोय ते सोज्वळ चेह-याच्या शालूविषयी... सिनेमात जब्याची शालू अशी तिची ओळख. ही भूमिका साकारली होती राजेश्वरी खरात हिने.

 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या गाजलेल्या 'फँड्री' या सिनेमात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि सूरज पवार यांच्यासह आणखी एका नवोदित चेह-याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आम्ही बोलतोय ते सोज्वळ चेह-याच्या शालूविषयी... सिनेमात जब्याची शालू अशी तिची ओळख. ही भूमिका साकारली होती राजेश्वरी खरात हिने. खरं तर सिनेमात तिच्या तोंडी एकही डायलॉग नव्हता. मात्र पडद्यावरील तिचा वावर लाजवाब होता. या सिनेमातून राजेश्वरी प्रकाशझोतात आली. आता हा सिनेमा रिलीज होऊन तीन वर्षे उलटली. 'फँड्री'नंतर राजेश्वरी कुठेच दिसली नाही. मात्र आता राजेश्वरी पुन्हा एकदा अभिनयाकडे परतली आहे. लवकरच तिचा नवा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
  या तीन वर्षांत राजेश्वरी कुठे होती, सध्या ती काय करतेय, ती मुळची कुठली, तिच्या नवीन सिनेमाचे नाव काय, यासह अनेक गोष्टींचा उलगडा आम्ही या पॅकेजमधून करतोय.
  चला तर मग जाणून घेऊया, प्रेक्षकांच्या लाडक्या 'शालू'च्या नव्या सिनेमाविषयी आणि सोबतच तिच्याविषयीसुद्धा... आणि हो, शेवटच्या स्लाईडवर राजेश्वरीच्या नव्या सिनेमाचा टीझर बघायला विसरु नका...
  (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  अभिनेत्री राजेश्वरी खरात हिच्या नवीन सिनेमाचे नाव आहे 'अॅटमगिरी'. अतिशय हटके असे राजेश्वरीच्या या सिनेमाचे शीर्षक आहे. या सिनेमात राजेश्वरी मेन लीडमध्ये झळकणारेय. प्रदीप टोनगे दिग्दर्शित या सिनेमाचा टीझर अलीकडेच रिलीज करण्यात आला. या टीझरमध्ये राजेश्वरीचे सोज्वळ रुप लक्ष वेधून घेत आहे. या सिनेमात राजेश्वरीसोबत 'धग' फेम अभिनेता हंसराज जगताप झळकणारेय. शिवाय राहुल पुणे हा अभिनेतासुद्धा या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. सिनेमात राजेश्वरीची भूमिका नेमकी काय, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. सिनेमाचे शूटिंग आता शेवटच्या टप्प्यात आले असून यावर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे समजते. (सिनेमाचा टीझर बघा शेवटच्या स्लाईडवर...)

  पुढील स्लाईडमध्ये बघा, राजेश्वरी खरातच्या 'अॅटमगिरी' या सिनेमाचे पोस्टर... 

 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  सिनेमाच्या हटके शीर्षकावरुन त्याची कथा, संकल्पना नक्कीच वेगळी असेल असे वाटते.

  पुढे वाचा, राजेश्वरी खरात तीन वर्षे कुठे आणि काय करत होती... सोबतच तिची 'फँड्री' या गाजलेल्या सिनेमात कशी निवड झाली होती... 

   

   

   

 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  राजेश्वरी खरात मुळची पुण्याची आहे. 'फँड्री' या सिनेमाच्या वेळी ती दहाव्या वर्गात शिकत होती. आता राजेश्वरी बी. कॉम फस्ट इयरमध्ये आहे. नुकतीच तिने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. फँड्रीनंतर राजेश्वरीने शिक्षणाकडे लक्ष दिले. याचकाळात तिला 'अॅटमगिरी' या सिनेमाची ऑफर आली. सध्या तिच्या या सिनेमाचे शेवटच्या टप्प्यातील शूटिंग सुरु आहे.

  पुढे वाचा, राजेश्वरीला कसा मिळाला होता 'फँड्री' सिनेमा... 

 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  राजेश्वरीच्या घरात अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नाहीये. तिचे वडील बँकेत नोकरी करतात. तिला एक धाकटी बहीण आणि भाऊ आहे. फँड्री या सिनेमातील राजेश्वरीची शालूच्या भूमिकेसाठी झालेली निवड ही खूप इंट्रेस्टिंग पद्धतीने झाली होती.
 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  त्यावेळी 'फँड्री'ची टीम एका मुलीच्या शोधात होती. त्यावेळी पुण्यात ऑडिशन सुरु होते. मात्र शालू या पात्रासाठी हवा तसा चेहरा गवसत नव्हता.
 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  'फँड्री' टीममधील गणेश नावाच्या तरुणाला एकेदिवशी पुण्याच्या रस्त्यावर राजेश्वरी दिसली. ही शालूच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे त्याला वाटले. मात्र ती कोण आहे, कुठे राहते, याविषयी त्याला काहीच ठाऊक नव्हते. गणेश टीमकडे आला आणि शालूच्या भूमिकेसाठी एक मुलगी योग्य वाटत असल्याचे टीमला सांगितले.
 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  कुणीतरी एका मुलीने माझ्यासोबत चला आणि आपण तिला विचारु असं गणेश म्हणाला. या टीममधून प्रियांका नावाची मुलगी गणेशसोबत राजेश्वरीकडे गेली. तिला सिनेमाविषयी सांगितले, तेव्हा तिने नकार दिला.
 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  पण तिची समजूत घालून तिच्या आईवडिलांची भेट घेतली. त्यांची परवानगी घेतली. त्यांनी होकार दिल्यानंतर राजेश्वरीचेही ऑडिशन घेण्यात आले
 • Fandry Fame Actress Rajeshwari Kharat New Film Itemgiri
  अशाप्रकारे राजेश्वरीची 'फँड्री' या सिनेमासाठी निवड झाली होती. आता 'अॅटमगिरी' या सिनेमातून राजेश्वरी आपल्या भेटीला येत आहे.
  पुढच्या स्लाईडवर बघा, राजेश्वरीच्या 'अॅटमगिरी' या सिनेमाचा खास टीझर... 

Trending