आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Based On Gopinath Munde\'s Life , SANGHARSHYATRA, Releasing On 11th December

\'संघर्ष यात्रा\'त श्रुती मराठेनी साकारली पंकजा मुंडेंची भूमिका, पाहा PHOTOS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडेंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री श्रुती मराठे... - Divya Marathi
पंकजा मुंडेंच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री श्रुती मराठे...
मुंबई- भाजपचे दिवगंत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित 'संघर्ष यात्रा' चित्रपटात अभिनेत्री श्रुती मराठे हिने पंकजा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. गोपीनाथ मुंडे यांची भूमिका अभिनेते शरद केळकर यांनी साकारली आहे. या चित्रपटाचा फस्ट लूक लाँच सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला. हा चित्रपट येत्या 11 डिसेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एका गाण्याचे पार्श्वगायन केले आहे.
याबाबत बोलताना श्रुती मराठे म्हणाली की, 'संघर्ष यात्रा' चित्रपटासाठी राज्यात ग्रामविकास आणि महिला व बालविकास खात्याच्या मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या भूमिकेसाठी मला विचारणा झाली. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला फारशी माहिती नव्हती. गोपीनाथ मुंडे यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतरच पंकजा मुंडे लोकांसमोर आल्या. त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे मी व्हिडिओ पाहिले. त्यांची भाषणे ऐकली. त्यांची बोलण्याची ढब माझ्या लक्षात आली. त्यानंतर मी ही भूमिका करू शकते असा विश्वास निर्माण झाला. त्यापूर्वी पंकजा मुंडेंना एकदा भेटले होते. मात्र, या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना मी भेटली. त्यांच्या काही समर्थकांकडून त्यांच्या सवयी, वागणे, बोलणे राहणे समजून घेतले. त्याचा मला भूमिका करताना फायदा झाला. या चित्रपटात वडील- मुलीच्या सुंदर नात्याची मांडणी पाहायला मिळेल असे सांगत श्रुतीने अधिक बोलण्यास नकार दिला.
या चित्रपटात गोपीनाथ मुंडे यांची भूमिका शरद केळकर यांनी साकारली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारखेच शरद केळकर यांचे धिप्पाड व्यक्तिमत्त्व आहे. दिग्दर्शक साकार राऊतने शरद केळकरची निवड करून रास्त चेहरा मिळवला आहे. या चित्रपटात गोपीनाथ मुंडेंचे बालपण, तारूण्य, महाविद्यालयीन काळ, राजकारणातील प्रवेश, प्रमोद महाजनांशी दोस्ती व नंतर राजकीय जीवनातील संघर्ष दाखविला आहे. त्यामुळेच या चित्रपटाला संघर्ष यात्रा असे नाव दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष केला हेच या चित्रपटातून दाखवले जाणार आहे.
या चित्रपटात प्रमोद महाजन, प्रविण महाजन यांच्यासह प्रज्ञाताई मुंडे यांच्यावर भाष्य करण्यात आले आहे. प्रमोद महाजन यांची भूमिका ओंकार कर्वे यांनी प्रविण महाजनांची व्यक्तिरेखा स्वप्निल देशमुख तर, प्रज्ञा मुंडे यांची भूमिका दिप्ती भागवत यांनी साकारली आहे. या चित्रपटात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रथमच एक गाणे गायले आहे. चित्रपटात पार्श्वगायन करण्याचा अमृता फडणवीस यांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे.
पुढे पाहा, छायाचित्राच्या माध्यमातून या चित्रपटाशी संबंधित माहिती...