आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा स्पृहा जोशी सह \'बायोस्कोप\' फिल्मच्या कलाकारांचा मराठमोळा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बायोस्कोप' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनींग मराठमोळ्या अंदाजात
चार दिग्दर्शक, चार कवी यांच्या चार लघुपटांचा कोलाज असलेला एकच चित्रपट, अशा अनोख्या संकल्पनेवर आधारीत 'बॉयोस्कोप' या सिनेमाच्या रिलीजनंतरचे स्पेशल स्क्रिनींग ठाण्यात थाटात झाले. सर्व कलाकार मराठमोळ्या अंदाजात नटून आले होते. सर्व अभिनेत्यांनी आणि दिग्दर्शकांनी भगवे फेटे घातले होते. तर सर्व अभिनेत्री मराठमोळ्या अंदाजात दिसत होत्या.
विशेष करून स्पृहा जोशी तर कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, केसांचा छान अंबाडा, गळ्यात लक्ष्मीहार, तन्मणीहार, मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि काठपदराची हिरवी साडी अशी मस्त नटून आली होती. त्यामुळे उपस्थित असलेल्या फोटो कॅमे-यांचं लक्ष सर्व कलाकारांमधून जास्त स्पृहाकडेच वेधलं जातं होतं. स्पृहाच्या पेहरावामुळे जमलेल्या कित्येक लोकाना पुन्हा एकदा स्पृहाच्या 'उंच माझा झोका गं' ह्या तिच्या मालिकेचीही आठवण झाली.
मराठी चित्रपटांच्या इतिहासात प्रथमच कवितेवरून सिनेमा बनविण्याचा आगळावेगळा प्रयोग दिग्दर्शक रवि जाधव, विजू माने, गजेंद्र अहिरे आणि गिरीश मोहिते यांनी केला आहे.
यावेळी 'बॉयोस्कोप'मधील 'मित्रा ' लघुपटातील दिग्दर्शक रवि जाधव, प्रमुख कलाकार संदीप खरे, विणा जामकर,मृण्मई देशपांडे. गजेंद्र अहिरे यांच्या 'दिल-ए-नादान' लघुपटातील नीना कुलकर्णी, सुहास पळशीकर. विजू माने यांच्या 'एक होता काऊ' मधील स्पृहा जोशी, कुशल बद्रिके, तसेच 'बैल'या गिरीश मोहितेंच्या लघुपटातील मंगेश देसाई, स्मिता तांबे, उदय सबनीस, सागर करंडे यांच्या बरोबर सलिल कुलकर्णी, नरेंद्र भिडे, सोहम फाटक, अविनाश-विश्वजीत हे संगीतकार सुध्दा उपस्थित होते.
या ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत करत आयोजित केलेल्या स्पेशल स्क्रिनींगला भाऊ कदम, पूजा सावंत, आनंद इंगळे, विद्याधर जोशी, गिरीश जोशी,शुभा जोशी, शिल्पा पुणतांबेकर, राजेश दातार, प्रसनजीत कोसंबी, अंजली कुलकर्णी हे सेलिब्रिटीज सुध्दा आवर्जुन उपस्थित होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मराठमोळ्या अंदाजातली स्पृहा जोशी आणि चित्रपटातले इतर कलाकार