आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:बिग बींमूळे आले म्युझिक लाँचला ग्लॅमर, पाहा ‘ढोलकी’च्या समारंभातले मराठी तारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ढोलकी' चित्रपटाचे म्युझिक लाँच
अमिताभ बच्चन यांच्या सत्तरीच्या दशकातल्या चित्रपटांमध्ये त्यांच्या लहानपणाची भूमिका साकारलेले मास्टर बिट्टू आणि मास्टर राजू आता दिग्दर्शक झाले आहेत. मास्टर बिट्टू म्हणजेच दिग्दर्शक विशाल देसाई आणि मास्टर राजू म्हणजेच दिग्दर्शक राजू देसाई या दोन भावांनी ‘ढोलकी’ ह्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आणि बिग बींच्या मिस्टर नटरवरलाल, याराना, बेनाम, दो और दो पांच, जंजीर चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेल्या ह्या अभिनेत्यांनी आपल्या चित्रपट दिग्दर्शनातल्या ह्या माइलस्टोन चित्रपटाचं म्युझिक लाँच अमिताभ बच्चन ह्यांच्या हस्ते नुकतेच झाले.
याविषयी मास्टर बिट्टू म्हणजेच विशाल देसाई म्हणतात,” आम्हांला लहानाचं मोठं होताना त्यांनी पाहिलंय. त्यांच्या बागबान चित्रपटाचा मी असिस्टंट डायरेक्टर होतो. आम्हां दोन्ही भांवडांच्या एवढ्या महत्वाच्या चित्रपटासाठी बिग बींनीच्याच हस्ते म्युझिक लाँच होणं, हे आमच्यासाठी खूप महत्वाच होतं”
अभिनेता सिध्दार्थ जाधव ढोलकी चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आणि बिग बींनी चित्रपटाचं लाँच केल्यावर त्यांनी चित्रपटाच्या पोस्टरवर आपला ऑटोग्राफ दिला. ह्या ऑटोग्राफला आता सिध्दार्थ जाधव चित्रपटाची टॅग लाइन असं म्हणू लागलाय. भारावून गेलेला सिध्दार्थ जाधव म्हणतो,”प्रत्येक चित्रपटाची एक टॅग लाइन असते. आणि ढोलकीची टॅग लाइन आहे, लव्ह अमिताभ बच्चन. हे माझ्यासाठी एक गिफ्टच आहे. आज कोणत्या सिनेमाची अशी टॅगलाइन असते. मी महेश मांजरेकरांच्या ‘शाहरूख मांजरसुंभेकर’च्या निमीत्ताने मी जलसामध्ये गेलो होतो. आणि त्यांच्यासोबत चित्रीकरणाचा अनुभव आला होता. पण ते ज्या ज्यावेळी समोर येतात, तेव्हा तेव्हा नि:शब्द होऊन जातो.”
ढोलकी चित्रपटात सिध्दार्थ जाधवसोबतच मानसी नाईक आणि कश्मिरा कुलकर्णी ह्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचं संगीत दिलंय, टब्बी-परिख ह्यांनी. तर आदर्श शिंदे, वैशाली सामंत, बेला शेंडे, अमोल बावडेकर ह्यांनी गाणी गायली आहेत.
म्युझिक लाँचवेळी ह्यातल्या धमाल गाण्यांवरही सिध्दार्थ, मानसी आणि कश्मिराने परफॉर्म केले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ढोलकी चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळचा मानसी नाईक आणि कश्मिरा कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज