आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Double Seat Wins Most Of The Awards In Zee Talkies MFK Awards Function

महाराष्ट्राचे फेवरेट ठरले सई, मुक्ता, अंकुश, प्रिया, स्पृहा, गश्मिर, सर्वाधिक पुरस्कार \'डबलसीट\'ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी टॉकिजच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण(MFK) अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक म्हणजेच पाच पुरस्कारांची विजेती फिल्म ठरलीय डबलसीट
Zee Takies MFK Awards -2015ची ही आहे विजेत्यांची लिस्ट -
महाराष्ट्राचा फेवरेट गायक – जसराज जोशी – (किती सांगायचंय मला – डबलसीट)
महाराष्ट्राची फेवरेट गायिका – आनंदी जोशी (किती सांगायचंय मला – डबलसीट)
महाराष्ट्राचे फेवरेट गाणे – किती सांगायचंय मला – डबलसीट
महाराष्ट्राचा फेवरेट नवोदित अभिनेता – गश्मीर महाजनी – देऊळबंद
महाराष्ट्राची फेवरेट बालकलाकार – सायली भंडारकर – एलिझाबेथ एकादशी
महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री – सई ताम्हणकर – क्लासमेट
महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेता – वैभव मांगले – टाइमपास-२
महाराष्ट्राचा फेवरेट लक्षवेधी चेहरा – प्रिया बापट
महाराष्ट्रचा फेवरेट स्टाइल आयकॉन – अंकुश चौधरी
महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता – अंकुश चौधरी – डबलसीट
महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री – मुक्ता बर्वे – डबलसीट
महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक – परेश मोकाशी – एलिझाबेथ एकादशी
महाराष्ट्राची फेवरेट फिल्म – डॉ. प्रकाश बाबा आमटे
अंकुश चौधरीला महाराष्ट्रचा फेवरेट स्टाइल आयकॉन आणि महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता हे दोन पुरस्कार मिळाल्याने तो अर्थातच खुश होता. तो म्हणाला, “स्टाइल आयकॉन हे अवॉर्ड मला चौथ्यांदा मिळतंय. त्यामुळे छानच वाटतंय. डबलसीटच्या अभिनयासाठीही मला पुरस्कार मिळालाय. डबलसीटचा पुरस्कार हा खरं तर माझ्या लेखक-दिग्दर्शकाचा आहे. त्यामुळे हे अवॉर्ड माझ्या इतकंच त्यांचं आहे.”
मुक्ता बर्वे महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री झालीय. पुरस्कार सोहळ्यानंतर ती म्हणाली, “महाराष्ट्राचा फेवरेट कोण हा पुरस्कार सोहळा मी पहिल्यांदाच अटेंड केला. ह्या पुरस्कारात सोहळ्यातलं माझं हे अवॉर्डही पहिलंच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही पहिल्या-वहिल्या गोष्टींची गोडी खूप छान आहे. एक तक डबलसीटला सर्वाधिक अवॉर्ड्स मिळालीयत. त्यामूळे ही गोष्ट डबलसीटच्या सर्वच कलावंतासाठीच आनंदाची आणि अभिमानाची आहे.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सई, मुक्ता, अंकुश, स्पृहाचे फोटो