आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Filmy ‘गुरू’चं फिल्मी प्रमोशन, गुरूचा Romance ‘फिल्मी फिल्मी हुआ’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरू चित्रपटाचं नवं रोमँटिक गाणं नुकतंच लाँच झालंय. क्षितीज पटवर्धनने लिहीलेलं आणि पंकज पडघनने संगीतबध्द केलेलं हे फिल्मी गाणं विजय प्रकाशने गायलंय. गाण्याचे शब्द जेवढं फिल्मी आहेत तेवढंच त्याचं चित्रीकरणही फिल्मी झालंय.
हे फिल्मी गाणं फिल्मी स्टाइलने मुंबईत लाँच करण्यात आलं. गुरूचं २० फुटांचं पोस्टर लाँच करण्यात आलंय. एक मोठ्या क्रेनवर चढून गुरू आणि त्याच्या मँगो डॉलीने वाजत गाजत ढोल-ताश्यांच्या गजरात हे फिल्मी पोस्टर लाँच केलंय.
गाण्याविषयी कोरीओग्राफर उमेश जाधव म्हणतो, “रावडी गुरू प्रेमात पडतो. आणि मग त्याच्या स्वभावाच्या विरूध्द तो प्रेमळ वागतो. त्यामुळे परस्परविरोधी अनेक गोष्टी तुम्हांला ह्या गाण्यांत दिसतील. शेंडीवाले ब्राम्हण व्हायोलिन वाजवताना दिसतील. दशावतारी सेक्साफोन वाजवताना दिसतील. कारण प्रत्येकजण आपल्या स्वभावाच्या विरूध्द वागतोय. हिरो-हिरोइनचे सहा वेगवेगळे लूक असलेलं हे गाणं आहे. कॉस्च्युम डिझाइन असो की सेट असो खूप रंगीत आहेत. खूप जास्त नाचण्याच्या स्टेप्स न देता हे गाणं मी कोरीओग्राफ केलंय.”
उर्मिला कोठारे आपल्या गाण्याविषयी सांगते,“पहिल्यांदा मी अशी लाजलीय, लटके-झटके दाखवत नाचलीय. मला तसं वागायला मजा आलीय. रोमँटिक गाणं म्हटलं की, समुद्रकिनारी किंवा एखाद्या वाळवंटात धावणारे हिरो-हिरोइन दिसतात. प्लेन साड्या नेसून मोठा पदर उडणारी हिरोइन दिसते. पण हे गाणं खूप वेगळं आहे. हे गाणं पटकन मनाला आवडणारं आहे.”
‘गुरू’ अंकुश चौधरी गाण्याबद्दल सांगतो, “गुरू फिल्मी आहे. त्याच्या आयुष्यातली मँगो डॉली सुध्दा फिल्मी आहे. आणि आमच्या फिल्मचा दिग्दर्शकही खूप फिल्मी आहे. संजय जाधवला एखादी गोष्ट आवडली की तो ‘क्या मस्त है. इसको देखके व्हायोलिन बज गया यार..’अशी दाद देतो. त्यामुळेच कदाचित गुरूच्या ह्या रोमँटिक ट्रकमध्ये तुम्हांला व्हायोलिन दिसतायत.. टिपीकल फिल्मीनेस दिसतोय. आणि कलरफुल गाणं झालंय.गाणं जितकं कलरफुल आहे, तेवढचं प्रमोशनही कलरफुल होतंय.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुरू चित्रपटाचे गाणे