आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हम आपके है कौन\'ची 23 वर्षे : आजारपणामुळे झाला होता लक्ष्मीकांत यांचा मृत्यू, जाणून घ्या Facts

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सलमान खान आणि माधुरी दीक्षित स्टारर 'हम आपके है कौन' या चित्रपटाच्या रिलीजला नुकतीच 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 ऑगस्ट 1994 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटातील गाणी, संवाद आणि विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. 100 कोटींहून अधिकचा व्यवसाय करणारा हा सिनेमा होता. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणा-या लक्ष्मीकांत बेर्डें यांचा उल्लेख न करुन कसे चालेल. आपल्या अचुक कॉमिक टायमिंगने लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही भाविनक दृश्यांत प्रेक्षकांना रडवलेदेखील. मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणारे लक्ष्मीकांत यांना या जगाचा निरोप घेऊन जवळजवळ 13 वर्षे झाली आहेत. पण कलाकृतींच्या माध्यमातून ते आजही आपल्यातच आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते दोनदा लग्न...
- लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. 3 नोव्हेंबर 1954 रोजी त्यांचा जन्म झाला होता. 
- त्यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला. 
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते.  
- अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयचे याचवर्षी ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण झाले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदी 16 वर्षांची असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे. 

रुही बेर्डेंचा यशात होता मोठा... 
- एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत आणि रुही यांच्याविषयी सांगितले होते, की "लक्ष्मीकांत यांच्या यशात सर्वोत मोठा वाटा हा रुही बेर्डेंचा होता. जेव्हा लक्ष्मीकांत प्रसिद्ध नव्हेत, त्याकाळात रुही यांनी त्यांना साथ दिली होती."

पुढे वाचा, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बरंच काही... 
बातम्या आणखी आहेत...