आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'किल्ला' ने केली तीन कोटींची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'किल्ला' चित्रपटाचे पोस्टर
या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या किल्ला या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात सूमारे तीन कोटी पंचवीस लाखांची कमाई केली आहे. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष सह अर्चित देवधर, पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी या बालकलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मानाचे पुरस्कार पटकावणा-या किल्ला’ने राष्ट्रीय पुरस्कारावरही मोहोर उमटवली. आणि त्यानंतर नुकताच किल्ला महाराष्ट्रातल्या २२५ सिनेमाहॉल्समध्ये रिलीज करण्यात आला होता. खरं तर, चित्रपटात कोणी स्टार कलाकार नाही आहे. पण तरीही सशक्त कथानक, देखण छायांकन, सहज अभिनय यामूळे किल्लाने तीन कोटींच्यांवर कमाई केलेली दिसून येते आहे.
रितेश देशमुख, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, अनुराग कश्यप, अमोल गुप्ते, स्वानंद किरकिरे, अतुल कुलकर्णी, राजकुमार यादव या बॉलीवूड कलावंतानीही सोशल मिडीया द्वारे या चित्रपटाला प्रमोट केले होते.
‘किल्ला’ ला मिळालेल्या या यशाबद्दल या चित्रपटाची सहनिर्मिती आणि वितरण करणारे एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने यांनी प्रतिक्रिया दिली आहे की ,“‘ यात खरं तर, अमृता सुभाष वगळता इतर कुणीही लोकप्रिय कलाकार नाहीये शिवाय इतर सर्व बाल कलाकार आहेत. त्यामुळे मराठीमध्ये विनोदीपटांना, प्रेमकथांना किंवा अॅक्शन चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग किल्लाकडे वळेल का हा एक प्रश्न होता. या चित्रपटात विनोद आहे पण तो रूढार्थाने विनोदी नाहीये.. प्रेमाची गोष्ट आहे पण ती आई – मुलाच्या नात्याची आहे, मैत्रीची आहे. चित्रपटाला मिळणारा हा प्रतिसाद हे मराठी चित्रपटक्षेत्रासाठी सकारात्मक चित्र आहे असं मी मानतो. हे यश जेवढं चित्रपटाच्या टीमचं आहे तेवढंच प्रेक्षकांचंही आहे.”
पूढील स्लाइड्समध्ये पाहा, कोणत्या बॉलीवूड कलावंताना पाहायचा होता, किल्ला