आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Film Mumbai Pune Mumbai 2 Writer Ashwini Shende Writes Script 36 Times

OMG: ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ च्या दिग्दर्शकाने फिल्मची स्क्रिप्ट लेखिकेकडून ३६ वेळा लिहून घेतली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईचा पाऊस जो दोन थेंब पडला की मुंबई बंद पडते, तो?.. पावसामुळे आमचं पुणं कधीच बंद पडत नाही..
हो,पुणं फक्त लंच टाइममुळेच बंद होतं.
अशा खुसखुशीत संवादामुळे सध्या ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ची उत्सुकता वाढलीय. हे संवाद लिहीलेयत, ‘अग्निहोत्र’, ‘कळत-नकळत’, ‘माझिया प्रियाला’, ‘दोन किना-यावर आपण दोघे’, ‘मला सासू हवी’ अशा मालिका लिहीणा-या लेखिकेने. डेली सोपमध्ये ब-याचदा खूप मेलोड्रामॅटिक सीन लेखकांना लिहावे लागातात. मात्र पहिल्याच चित्रपटात अश्विनी शेंडेने खुमासदार शैलीत, खळखळवून हसवणारे पुणे-मुंबई स्टाइलचे विनोद लिहीले आहेत. त्यावर अश्विनी म्हणते, “ मालिका लिहून खूप कंटाळले होते. चित्रपट लिहीण्याची इच्छा होती. ‘प्रेमाची गोष्ट’ आणि ‘गैर’ चित्रपटाची मी गाणी लिहीलीयत. त्यावेळी मी सतिशला माझी चित्रपट लिहीण्याची इच्छा व्यक्त केली. आणि MPM2 साठी त्याचा मला कॉल आला. आणि मी एका पायावर तयार झाले.”
पण खुशीत असलेल्या अश्विनीसाठी ही फिल्म लिहाणं सोप्प नव्हतं. तिला खूप मेहनतही करावी लागली. तिच्याकडून ‘मुंबई पुणे मुंबई-२’ची स्क्रिप्ट ३६ वेळा सतीश राजवाडेंनी लिहून घेतली. ह्या बातमीला divyamarathi.comशी बोलताना सतिश राजवाडेंनी दुजोरा देताना म्हटलं, “ मुंबई-पुणे-मुंबई ने एक उंची गाठल्यावर त्याच्यापेक्षा जास्त चांगली दुसरी स्क्रिप्ट लिहीणं आवश्यक होते. त्यामुळे अतिउत्तमचं यावं ह्यासाठी आमचा हा प्रयत्न होता. अश्विनीची खूप चिकाटी होती. त्यामुळेच तिनेही कुरबुर न करता मेहनत घेतली. जवळ जवळ साडेसात आठ महिने आम्ही स्क्रिप्ट लिहीत होतो. मुंबई-पुण्याचे विनोद आपण सोशल नेटवर्किंग साइटवरून नेहमीच ऐकतो. आणि त्यामुळे आता पुन्हा तेच चित्रपटात पाहत असल्यासारखे वाटू नये, म्हणून आम्ही जास्त मेहनत केली.”
अश्विनी ह्यावर म्हणते, “हो आणि ह्या सगळ्यात मी खूप शिकत गेले. कंटाळा न केल्याने लिखाणातला ताजेपणा टिकून होता.”
अश्विनी ह्यासंदर्भातला किस्सा सांगते, “हॅरी पॉटर ही खूप हॉलीवूडची प्रसिध्द चित्रपट मालिका आहे. सात भागानंतर त्या पुस्तकाच्या लेखिकेने पूर्णविराम घेण्याचा निर्णय घेतला आणि सातवा चित्रपट हॅरी पॉटरचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यावेळी माझ्याभाचीला खूप वाटलं, की आता पुढे चित्रपट नसणार त्यावेळी तिने उत्स्फुर्तपणे एक स्क्रिप्ट स्वत:च्या मनाने लिहीली होती. अगदी तशीच उत्सफुर्तता माझ्याही लिखाणात टिकावी हा मी प्रयत्न केलाय. गौरी-गौतम एकमेकांच्या प्रेमात पडले हे आपण पहिल्या चित्रपटात पाहिल्यावर दुस-या चित्रपटात त्यांचं लग्न व्हायला हवं, हे तो चित्रपट पाहिलेल्या कोणालाही वाटावं. तेच वाटून घेतलं. आणि मग त्यांचे घरातले लोकं आले तर काय गंमतीजमती होतील ह्याचा विचार करून मग संपूर्ण स्क्रिप्ट लिहीली.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मुंबई-पुणे-मुंबई-२ चे संवाद